एक्स्प्लोर
मोटो Z आणि मोटो G4 सीरिजला अँड्रॉईड 7.0 नोगट अपडेट

मुंबई : गूगल नेक्ससनंतर मोटोरोला आपल्या ग्राहकांना अँड्रॉईड 7.0 नोगटचा अपडेट देणार आहे. मोटोरोलाच्या मोटो Z आणि मोटो G4 सीरिजला हा अपडेट मिळणार आहे.
मोटोच्या स्मार्टफोन ग्राहकांना या अपडेटसाठी जानेवारी 2017 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मोटोरोलाने बनवलेल्या नेक्सस 6ला काही दिवसांपूर्वीच हा अपडेट देण्यात आला आहे. मोटोच्या G2, G3 आणि X2 या लोकप्रिय स्मार्टफोनना हा अपडेट दिला जाईल का, याबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.
गूगलने अँड्रॉईड 7.0 नोगटमध्ये क्विक सेटिंग आणि मल्टी-विंडोची सुविधा दिली आहे. तसंच नोगट अपडेटमध्ये बॅटरीचा परफॉर्मन्सही सुधारण्यात आला आहे.
कोणत्या फोनना मिळणार अँड्रॉईड 7.0 नोगट अपडेट?
-Moto G4
-Moto G4 Plus
-Moto G4 Play
-Moto Z
-Moto Z Play
-Moto X Force
-Moto X Style
-Moto X Play
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















