एक्स्प्लोर
3 आणि 4 GB रॅम व्हेरिएंट, मोटो X4 चे फीचर्स लीक
मुंबई : लेनोव्होचा अपकमिंग स्मार्टफोन मोटो एक्स 4 चे फीचर्स पुन्हा एकदा समोर आहेत. एका बेंचमार्क वेबसाईटच्या माहितीनुसार हा फोन 3GB आणि 4 GB रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीही हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाईल, असं बोललं जात होतं.
जीएफएक्सबेंच लिस्टिंगमध्ये मोटो फोन एक्सटी 1789 या मॉडेलनंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे हा मोटो 4 असण्याची शक्यता आहे. मात्र या फोनच्या स्टोरेज बाबतीत सध्या संभ्रम आहे. कारण लिस्टिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार 16 GB स्टोरेज आहे. तर यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार 32 GB स्टोरेज असेल, असं म्हटलं होतं.
दरम्यान 3 आणि 4 GB रॅम असे दोन व्हेरिएंट असतील असं बोललं जात आहे. त्याचाच अर्थ असा की दोन व्हेरिएंट असल्याचं 3GB व्हेरिएंटला 16GB स्टोरेज असेल, तर 4GB व्हेरिएंटला 32 GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे.
या फोनची विशेषता म्हणजे हा पहिलाच नॉन-गुगल स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. जो फाय एमव्हीएनओ या सेवेला सपोर्ट करणार असल्याची माहिती आहे. 25 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात हा स्मार्टफोन लाँच केला जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यता आलेली नाही.
मोटो X4 मध्ये फीचर्स काय असतील?
- अंड्रॉईड 7.1.1 नॉगट सिस्टम
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- 12 आणि 8 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा
- 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3 GB/4 GB रॅम व्हेरिएंट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement