एक्स्प्लोर
Moto G5s स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 4,000 रुपयांची कपात
मोटोरोला आपल्या नव्या G सीरीजचा स्मार्टफोन मोटो G6 हा 19 एप्रिलला लाँच करणार आहे. पण त्याआधी कंपनीने आपल्या मोटो G5sच्या किंमतीत कपात केली आहे.
मुंबई : मोटोरोला आपल्या नव्या G सीरीजचा स्मार्टफोन मोटो G6 हा 19 एप्रिलला लाँच करणार आहे. पण त्याआधी कंपनीने आपल्या मोटो G5sच्या किंमतीत कपात केली आहे. आता हा स्मार्टफोन 9,999 रुपयांना उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी मोटो G5s 13,999 रुपयांना लाँच केला होता. त्यामुळे आता या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 4,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केल्याने मोटो G6 बजेट स्मार्टफोनची किंमत 15 हजारांच्या जवळपास असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Moto G5s चे फीचर :
या स्मार्टफोनच खासियत म्हणजे याचा ड्यूल रिअर कॅमेरा सेटअप. Moto G5s मध्ये 5.2 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. ज्याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. यामध्ये ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड नॉगट 7.1 ओएसवर आधारित आहे.
या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच यामध्ये 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement