एक्स्प्लोर
मोटो ई3 पॉवर स्मार्टफोनचं आज भारतात लाँचिंग

मुंबई: मोटोरोला सोमवारी भारतात आपला नवा स्मार्टफोन मोटो ई3 पॉवर लाँच करणार आहे. कंपनीने आतापर्यंत मोटो ई3 पॉवरचे अनेक टीजर लाँच केले आहेत. या महिन्यापासूनच हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मागील महिन्यात मोटो ई3 पॉवरची हाँगकाँगमध्ये विक्री सुरु झाली होती. याची किंमत 1,098 हाँगकाँग डॉलर (केवळ 9,500) होती. या स्मार्टफोनमध्ये 5 इंच एचडी 720x1280 पिक्सल डिस्प्ले आहे. यामध्ये 1 गीगाहर्त्झ मीडियाटेक क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आलं असून त्यात 2 जीबी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी आहे. तर 128 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सिस्टमवर आधारित आहे. तसेच यात ड्युल सिम सपोर्ट आहे. यात 4जी, एलटीई, जीपीएस आणि ब्ल्यूटूथ आणि वायफाय हे फीचरही आहेत. तर याची बॅटरी क्षमता 3500 एमएएच आहे.
आणखी वाचा























