एक्स्प्लोर
मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन, Moto E3 Power, स्वस्त आणि मस्त!
मुंबई: मोटोरोलाचा सर्वात स्वस्त अशी ख्याती मिळवलेला मोटोरोला E सीरिजमधील मोटो E3 पॉवर हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. मोटोरोला इंडियाच्या ट्वीटर हँडलवरून या स्मार्टफोनचा टीझर लाँच करण्यात आला आहे.
मोटोरोलाने कालच मोटोरोला E3 पॉवर या स्मार्टफोनची विक्री हाँगकाँगमध्ये सुरू केली. त्यानंतर लगेच त्यांच्या भारतातील ट्वीटर हँडलवर या नव्या मॉडेलचा टीजर जारी करण्यात आला.
मोटोरोला E3 पॉवर हा गेल्याच महिन्यात यूकेमध्ये लाँच करण्यात आलेल्या Moto E3 या स्मार्टफोनचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. भारतात आता मोटो E3 च्या ऐवजी थेट Moto E3 पॉवर हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. भारतात मोटो जी च्या अभूतपूर्व लोकप्रियतेनंतर मोटो ई आणि मोटो ई2 हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते. मोटो जी च्या तुलनेत खूपच कमी किंमत असल्यामुळे त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता मोटो ई सीरिजमधल्या Moto E3 पॉवर या नव्या व्हर्जनची भर पडणार आहे.
थोडक्यात सांगायचं तर या नव्या स्मार्टफोनमध्ये नावाप्रमाणेच मोठ्या क्षमतेची बॅटरी, सुधारीत कॅमेरा तसंच जास्तीची मेमरी देण्यात आलीय. सर्वात महत्वाचं म्हणजे हा स्मार्टफोन 4G LTE ने सुसज्ज आहे.
मोटोरोला इंडियाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून काल मोटो ई 3 पॉवरच्या लाँचिंगबाबत तीन ट्वीटमधून टीजर जारी करण्यात आले.
हाँगकाँगमध्ये काल विक्रीसाठी खुल्या करण्यात आलेल्या मोटो ई 3 पॉवर या स्मार्टफोनची किंमत 1098 एचकेडी म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये अंदाजे 9500 रूपयांच्या आसपास आहे.
मोटो ई 3 पॉवरच्या स्पेसिफिकेशन्सचा आढावा घ्यायचा तर...
या स्मार्टफोनची स्क्रीन 5 इंच एचडी म्हणजेच 720x1280 पिक्सेलचा आयपीएस डिस्प्ले दर्जाचा आहे. तसंच या स्मार्टफोनचा प्रोसेसर 64 बिट 1GHz चा मीडियाटेक क्वाडकोअर हा आहे. या स्मार्टफोनची मेमरी 2 जीबी आहे. तसंच इनबिल्ट मेमरी 16 जीबी आणि एसडी मेमरी कार्डद्वारे ती 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
मोटो ई 3 पॉवरचा मुख्य म्हणजे रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा तर फ्रंट म्हणजे सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे. हा स्मार्टफोन अँड्राईडच्या लेटेस्ट 6.0.1 मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. तसंच एकाचवेळी दोन सिम वापरता येऊ शकतात. तसंच या स्मार्टफोनची बॅटरी 3500mAh क्षमतेची आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement