एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जयललिता यांच्यावरील 'ती' फेसबुक पोस्ट व्हायरल, लाईक्स, कमेंट्सचा पाऊस
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 68 वर्षांच्या होत्या. जयललितांच्या रुपाने दक्षिण भारताच्या राजकारणातील दिग्गज चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. सोमवारी रात्री ११.३० वाजता अपोलो रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
जयललिता यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सोशल मीडियावरही त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. राजकारणापलिकडे जात अनेकांनी जयललिता यांच्याबद्दल पोस्ट लिहिल्या.
जयललिता यांचा वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातील प्रवास हा काही साधा-सरळ नव्हता. अनेक खडतर खाच-खळग्यांतून त्या इथवर पोहोचल्या होत्या. एक अभिनेत्री ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्री, इतकंच नव्हे तर कमालीच्या लोकप्रिय राजकीय नेत्या हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
चेन्नईत टाटा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या चरन्या कन्नन यांनी जयललिता यांच्यावर एक फेसबुक पोस्ट शेअर केली. चरन्या यांनी अत्यंत मोजक्या शब्दात जयललिता यांचा आतापर्यंत प्रवास मांडला. चरन्या यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. गेल्या 13-14 तासांमध्ये 48 हजाराहून अधिक लाईक्स, शेकडो कमेंट्स या पोस्टला असून, तब्बल 22 हजारांहून अधिकवेळा ही पोस्ट शेअर झाली आहे.
राजकारणापलिकडे जयललिता यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, हे चरन्या यांनी आपल्या पोस्टमधून सांगितले आहे. पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक आणि पक्षाशी संबंध नसलेल्या लोकांच्या मनातही जयललिता यांच्याबद्दल आदर होता, तो कशामुळे, हे या पोस्टमधून चरन्या यांनी मांडलं आहे.
चरन्या कन्नन यांची फेसबुक पोस्ट -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
धाराशिव
राजकारण
निवडणूक
Advertisement