एक्स्प्लोर

अफवांना आळा, तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद होणार?

राष्ट्रीय सुरक्षा किंवा नागरी सुरक्षेला धोका असेल तेव्हा फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम यासारखे सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकतात.

नवी दिल्ली: तणावाच्या परिस्थितीत फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारखा सोशल मीडिया ब्लॉक करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. आपत्कालीन स्थितीत सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवांमुळे तणावात भर पडू नये, म्हणून सरकारने थेट सोशल मीडियावर निर्बंध आणण्याबाबत सल्लामसलत सुरु केली आहे. त्यासाठी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सल्ला मागितला आहे. राष्ट्रीय सुरक्षा किंवा नागरी सुरक्षेला धोका असेल तेव्हा फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम यासारखे सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकतात. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत दूरसंचार मंत्रालयाशी चर्चा सुरू केली आहे. तणावाच्या स्थितीत इंटरनेट सुरु असेल, पण सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी आणण्याबाबतच्या पर्यायावर विचार सुरु आहे. दूरसंचार विभागानं 18 जुलै रोजी यासंदर्भातील पत्र टेलकॉम ऑपरेटर, भारतीय इंटरनेट सेवा प्राधिकरण,  सेल्युलर ऑपरेटर्स एसोसिएशन ऑफ इंडियाला पाठवलं आहे. त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षेला धोका किंवा शांतता भंग होत असेल अशा वेळी सोशल मीडिया बंद ठेवण्याबद्दलचा विचार केला जातोय. आयटी अॅक्ट 69 ए नुसार केंद्र सरकारला सोशल मीडियावर निर्बंध घालण्याचे अधिकार आहेत. त्याचा हवालाही पत्रात देण्यात आलाय. गेल्या काही दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून आफावांना ऊत आलाय. यातून जमावानं काही लोकांची हत्याही केली. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा सल्ला मागवला आहे. कलम 69 A नुसार, कोणत्याही कॉम्प्युटर स्त्रोताद्वारे कोणतीही अफवा/सूचना जनतेपर्यंत पोहोचू नये, यासाठी आदेश देण्याचा अधिकार आहे. सद्या देशभरता सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांमुळे अनेक बळी गेले आहेत. व्हॉट्सअपद्वारे तर अफवा पसरण्याचं प्रमाण खूप आहे.  त्यामुळे व्हॉट्सअप अनेकवेळा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिलं आहे. व्हॉट्सअप मेसेजवर नियंत्रण नसल्यामुळे अनेक ठिकाणी अफवांमुळे मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपत्कालीन परिस्थितीत सोशल मीडियावर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर राज ठाकरे सर, नर्गिसने मानले मनसेप्रमुखांचे आभार; पोलिसांकडून अपेक्षाभंग, पण मनसैनिक मदतीला धावले
मिस्टर राज ठाकरे सर, नर्गिसने मानले मनसेप्रमुखांचे आभार; पोलिसांकडून अपेक्षाभंग, पण मनसैनिक मदतीला धावले
Rinku Singh : केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलला मागं टाकलं
केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलचा विक्रम मोडला
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगवान, NATM पद्धतीने होतोय 21 किमीचा बोगदा
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगवान, NATM पद्धतीने होतोय 21 किमीचा बोगदा
संजय राऊत दिलदार, भावुक झाला शिल्पकार; खिशातून 500 चं बंडल काढत बैलजोडी घेतली, खटाखट नोटा मोजल्या
संजय राऊत दिलदार, भावुक झाला शिल्पकार; खिशातून 500 चं बंडल काढत बैलजोडी घेतली, खटाखट नोटा मोजल्या

व्हिडीओ

Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Kalpana Kharat | गरिबीत पोरं वाढलेली, ती शाळेत पायी जायची, कल्पना खरातच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर 'आप'ने कारवाई का केली?
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मिस्टर राज ठाकरे सर, नर्गिसने मानले मनसेप्रमुखांचे आभार; पोलिसांकडून अपेक्षाभंग, पण मनसैनिक मदतीला धावले
मिस्टर राज ठाकरे सर, नर्गिसने मानले मनसेप्रमुखांचे आभार; पोलिसांकडून अपेक्षाभंग, पण मनसैनिक मदतीला धावले
Rinku Singh : केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलला मागं टाकलं
केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलचा विक्रम मोडला
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगवान, NATM पद्धतीने होतोय 21 किमीचा बोगदा
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगवान, NATM पद्धतीने होतोय 21 किमीचा बोगदा
संजय राऊत दिलदार, भावुक झाला शिल्पकार; खिशातून 500 चं बंडल काढत बैलजोडी घेतली, खटाखट नोटा मोजल्या
संजय राऊत दिलदार, भावुक झाला शिल्पकार; खिशातून 500 चं बंडल काढत बैलजोडी घेतली, खटाखट नोटा मोजल्या
Dharashiv News: आई राजा उदो उदोचा जयघोष....येडाईच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, लाखो भाविकांचा जनसागर लोटला
आई राजा उदो उदोचा जयघोष....येडाईच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, लाखो भाविकांचा जनसागर लोटला
Iran War Live Update: इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!
इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!
“जो डर गया, समझो मर गया” आम्ही डोळ्यात डोळे घालून सरकारला भिडत असताना, केजरीवाल जेलमध्ये असताना देशाबाहेर लपला होता, तुम्ही मोदी भाजपला एक प्रश्न विचारला नाही; आपने राघव चड्ढांची 'साॅफ्ट' कुंडली बाहेर काढली

द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी
Embed widget