एक्स्प्लोर

मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री असताना एएआयबीची स्थापन करण्यात आली होती.

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या विमान (Airplane) अपघाताच्या संदर्भात केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी एएआयबीची चौकशी लावली आहे. एएआयबी (AAIB) ही स्वतंत्र चौकशी संस्था असून ती केंद्रीय हवाई उड्डान मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. या चौकशी यंत्रणेला जगातील कोणत्याही चौकशी यंत्रणेची मदत मागून या अपघाताची चौकशी करता येते अशी तरतूद आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. तसेच, या घटनेची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार, आता चौकशी सुरू झाल्याचे दिसून येते. 

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री असताना एएआयबीची स्थापन करण्यात आली होती. आपल्या देशात विमान दुर्घटनेच्या संदर्भात स्वतंत्र चौकशी करण्याकरिता संघटना पाहिजे म्हणून या चौकशी समितीची निर्मिती करण्यात आली होती. दुर्घटनेतील सत्य समोर आलं पाहिजे आणि अपघातसंदर्भाने मुळात दोनच गोष्टी या चुकीच्या असू शकतील. एकतर वैमानिकाचा दोष किंवा विमानाचा दोष. त्यामुळे अपघाताची सगळी चौकशी झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. या पलीकडे कोणती चौकशी करण्याची समिती असेल त्याची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागणी करेन. पण, एएआयबीला चौकशीचे सर्वाधिकार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला दिली. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने अपघात की घातपात या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली जात असताना आता ही चौकशी सुरू झाल्याचे समोर आलं आहे. 

एएआयबी चौकशी होणार

दरम्यान, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात यावरुन शंका उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सातत्याने या विमान अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चौकशीच्या मागणीसंदर्भात नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिले होते. आता, केंद्रीय मंत्रालयाकडून या विमान अपघाताची एएआयबी चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे, आमदार रोहित पवारांच्या सातत्याच्या मागणीनंतर दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू झाल्याचं दिसून येतं.

हेही वाचा

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DCM एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DCM एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Rupee Record Low : गॅस दरवाढीनंतर आता 'रुपया'च्याही गटांगळ्या, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर
गॅस दरवाढीनंतर आता 'रुपया'च्याही गटांगळ्या, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर
Jalgaon Accident: धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
Beed Crime News: वंशाला दिवा पाहिजे, तीन मुली झाल्या म्हणून सासरच्याचं सुनेसोबत भयानक कृत्य, नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला परवानगीसाठी जबरदस्ती, चिमुकल्या मुलींवरचं आईचं छत्र हरपलं
वंशाला दिवा पाहिजे, तीन मुली झाल्या म्हणून सासरच्याचं सुनेसोबत भयानक कृत्य, नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला परवानगीसाठी जबरदस्ती, चिमुकल्या मुलींवरचं आईचं छत्र हरपलं
Iran Mosaic Defense: सरसेनापती गेला म्हणून रडायचं नाही लढायचं! इराणचे सर्वोच्च नेतृत्व संपूनही युद्ध कसा लढतोय तरी? पहिल्यांदाच चार पदरी आखणी समोर आली
सरसेनापती गेला म्हणून रडायचं नाही लढायचं! इराणचे सर्वोच्च नेतृत्व संपूनही युद्ध कसा लढतोय तरी? पहिल्यांदाच चार पदरी आखणी समोर आली
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
Iran War Live Update: इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
Embed widget