Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
छोट्या मोठ्या सरकारी कार्यालयांमध्ये असणारी लाचखोरीची कीड आता मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचं दिसून आलंय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील एका कारकुनाला ३५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. एसीबीनं सापळा रचून केलेल्या या कारवाईनंतर विरोधकांनी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय. त्याचवेळी झिरवाळांना अडकवण्यासाठी हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोपही विरोधक करू लागलेत. या प्रकरणात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.
हे आहे महाराष्ट्राचं मंत्रालय. कधी वेगवेगळ्या आंदोलनांनी… कधी सुरक्षा जाळीवर मारल्या जाणाऱ्या उड्यांनी.. तर कधी बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतील गोंधळामुळे चर्चेत असणारं मंत्रालय आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय. याचं कारण म्हणजे गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कारकुनाला लाच स्विकारतानाचा एसीबीनं सापळा रचून रंगेहाथ अटक केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. स्वतः झिरवाळांनीही अशी कारवाई झाल्याचं मान्य करत याच्याशी संबंधित सर्वांवर कारवाई होणार असल्याचं सांगितलं.
राजेंद्र ढेरंगे हा अन्न आणि औषध विभागात कारकून मेडिकल दुकानाचा परवाना निलंबित करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली तडजोडीअंती ३५ हजारांची लाच देण्याचं नक्की झालं. एसीबीनं मंत्रालयात सापळा लावला. दुसऱ्या मजल्यावर ही लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. याच कारवाईवेळी ४२ हजारांची वेगळी रोकडही एसीबीला सापडली. ही रक्कम कुठली, याचाही तपास एसीबी करणार आहे. अटक करण्यात आलेल्या राजू ढेरंगेला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
थेट मंत्रालयातच लाचखोरीचा हा प्रकार उघड झाल्यानंतर काँग्रेसनं सरकारवर हल्लाबोल केलाय. झिरवळांनी राजीनामा देण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालय सिल केले आहे. या घटनेने राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. चौकशीदरम्यान वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे या कर्मचा-याने सांगितल्याची माहिती समोर येतेय. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका मांडली आहे. मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे.
तर चौकशीतून आपल्याविरोधात काही निष्पन्न झालं, तर राजीनामा देण्याची तयारी झिरवळांनी दाखवलीय. मात्र त्याचवेळी आपला स्वभाव तसा नसल्याचं सांगत बचाव करण्याचाही प्रयत्न केलाय.
All Shows


































