एक्स्प्लोर

डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड

जळगाव शहरातील कालिंका माता चौक येथे भरधाव डंपरने भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली.

जळगाव : रस्ते अपघाताच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना आखल्या जातात. वाहतूक व्यवस्था, नियमावलींच्या प्रचार-प्रसारातून रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही अपघाताच्या (Accident) घटना घडतच आहेत. जळगाव (Jalgaon) शहरातील कालिंका माता चौकात डंपरने भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या वृद्धाला चिरडल्याची भीषण घटना घडली. प्रभाकर पाटील असे 57 वर्षीय वृद्धाचे नाव असून परिसरात घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाकडून डंपरवर दगडफेक व तोडफोड करण्यात आली. 

जळगाव शहरातील कालिंका माता चौक येथे भरधाव डंपरने भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. प्रभाकर पाटील (वय ५७) हे भाजीपाला घेऊन घरी जात असताना अपघात झाला असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान डंपर चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे अपघात  झाला असून चाक थेट तोंडावरून गेल्यामुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याच चौकात साधारण वर्षभरापूर्वी डंपरने एका बालकाला चिरडल्याची घटना घडली होती. त्यामुळे येथे अद्ययावत सिग्नल व्यवस्था सुरू करावी तसेच 24 तास वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही सुनेत्रा पवारांचेच नाव

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे जाणार याची चर्चा होत असताना आता सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल पटेल यांचे नाव समोर आले होते. त्यावरुन, राजकीय वर्तुळात वेगळ्याच आणि विरोधात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. तर, राष्ट्रवादीचे आमदार, खासदारही आपलं मत मांडताना सुनेत्रा पवार यांच्या नावाची मागणी करत होते. तर, पार्थ पवार यांचेही नाव पुढे आले होते. मात्र, पुढील दोन आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असून सुनेत्रा पवार यांचीच निवड केली जाणार असल्याची माहिती आहे.  

हेही वाचा

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?

महत्त्वाच्या बातम्या

कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget