एक्स्प्लोर

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  

Western Railway : पश्चिम रेल्वेकडून 19 फेब्रुवारीपासून 12 अतिरिक्त एसी लोकल चालवल्या जाणार आहेत. याशिवाय  3 नॉन एसी लोकल देखील सुरु करण्यात येणार आहेत. 

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी आरामदायी होण्यासाठी पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर 12 अतिरिक्त एसी लोकल 19 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येतील. तर, 3 नॉन एसी लोकल देखील सुरु करण्यात येणार आहेत. यामुळं लोकलनं प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यामुळं पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलची संख्या 1414 झाली आहे.  

एसी लोकलची वाढती लोकप्रियता लक्षात घेत तथा सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशी पर्याय उपलब्ध असावेत यामुळं पश्चिम रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वाचा हा निर्णय आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा म्हणून करण्यात आला  आहे. लोकल सेवांची वाढ गर्दी कमी करणं त्याचसोबत प्रवाशांना चांगला अनुभव मिळवून देण्यात फायदेशीर ठरेल, असं सांगण्यात आलं आहे. 

पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार 12  एसी लोकल  सुरु केल्या जाणार आहेत. ज्यापैकी 11  एसी लोकल सेवा सध्याच्या नॉन एसी लोकल सेवांच्या जागी चालवल्या जातील. तर, एक नवी एसी लोकल सुरु होईल. याशिवाय तीन अतिरिक्त नॉन एसी लोकल सेवा देखील सुरु केल्या जाणार आहेत. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलची संख्या 121 वरुन वाढून 133 झाली आहे. तर पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवांची संख्या 1410 वरुन  1414 झाली आहे. 

विशेष बाब म्हणजेच शनिवार आणि रविवारी चालवल्या जाणाऱ्या एसी लोकलची संख्या देखील 77 वरुन वाढवून 106 करण्यात आली आहे.यामुळं सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्यांना अधिक आरामदायी प्रवास करता येईल. याशिवाय  सध्या सुरु असलेली वांदेर ते भाईदर लोकल सेवा आता विरार पासून सुरु होईल. यामुळं प्रवाशांना अतिरिक्त सुविधा आणि चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.  


एसी लोकल सेवांमधील वाढ मुंबईकरांची लाईफ लाईन म्हटल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेला अधिक सुरक्षित आणि प्रवासीकेंद्री सेवा सुरु करण्याबाबत पश्चिम रेल्वेची कटिबद्धता दाखवतं.

महत्त्वाच्या बातम्या

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget