एक्स्प्लोर
Advertisement
मायक्रोमॅक्सचा Canvas 1 स्मार्टफोन लाँच, किंमत 6,999 रुपये
मायक्रोमॅक्सनं आपल्या कॅनव्हस सीरीजमधील नवा स्मार्टफोन 'कॅनव्हस 1' लाँच केला आहे. याची किंमत 6,999 रुपये आहे. हा 4G VoLTE स्मार्टफोन ऑफलाइन देखील उपलब्ध असणार आहे. मायक्रोमॅक्सनं या स्मार्टफोनवर 100-डे रिप्लेसमेंट ऑफरही दिली आहे.
मुंबई: मायक्रोमॅक्सनं आपल्या कॅनव्हस सीरीजमधील नवा स्मार्टफोन 'कॅनव्हस 1' लाँच केला आहे. याची किंमत 6,999 रुपये आहे. हा 4G VoLTE स्मार्टफोन ऑफलाइन देखील उपलब्ध असणार आहे. मायक्रोमॅक्सनं या स्मार्टफोनवर 100-डे रिप्लेसमेंट ऑफरही दिली आहे.
जर 100 दिवसांमध्ये या स्मार्टफोनच्या हार्डवेअरमध्ये काही समस्या उद्भवली तर कंपनी यूजर्सला नवा डिव्हाईस देईल.
कॅनव्हस 1 स्मार्टफोनचे खास फीचर्स
या स्मार्टफोनमध्ये 5 इंच स्क्रीन असून याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. तसेच यामध्ये 1.3 GHz क्वॉडकोअर मीडियाडटेक प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम असून 16 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तसेच एसडी कार्डच्या मदतीनं 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
यामध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 2500 mAh आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement