OnePlus आणि Oppo कंपन्यांचं विलीनीकरण, कसं काम करणार दोन्ही कंपन्या?
अलीकडेच, ओप्पो आणि वनप्लसने त्यांचे संशोधन आणि विकास विभाग (R&D) विलीन केले. आता यापुढे जाऊन दोन्ही कंपन्या आपसात विलीन होत आहेत.

Tech News : स्मार्टफोन निर्मात्या दोन मोठ्या कंपन्या एकत्र विलीन झाल्या आहेत. चीनची लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) आणि ओप्पो (Oppo) या कंपन्या विलीन झाल्या आहेत. त्यानंतर वनप्लस आता ओप्पोची सब-ब्रँड बनली आहे. या दोन्ही कंपन्या BBK इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत येतात. अधिकाधिक संसाधने एकत्रित करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी R&D विलीनीकरण करण्यात आले
अलीकडेच, ओप्पो आणि वनप्लसने त्यांचे संशोधन आणि विकास विभाग (R&D) विलीन केले. आता यापुढे जाऊन दोन्ही कंपन्या आपसात विलीन होत आहेत. वनप्लसचे सह-संस्थापक पीट लॉ आणि कार्ल पे यांनी यापूर्वी ओप्पोमध्ये एकत्र काम केले होते. वनप्लसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटलं की, आम्ही आमची कार्ये सुगम करण्यासाठी आणि अतिरिक्त शेअर्ड रिसोर्सेससाठी ओप्पोमध्ये आमच्या अनेक टीमचे विलीनीकरण केले. ज्यास आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर आम्ही आमची संस्था ओप्पोमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.
वनप्लस स्वतंत्रपणे कार्य करेल
या विलीनीकरणानंतरही, वनप्लस स्वतंत्रपणे कार्य करत राहील आणि ब्रँड नाव देखील सुरू राहील. परंतु दोन्ही कंपन्या एकमेकांशी रिसोर्सेस आणि टीम शेअर करतील. यापूर्वीही या कंपन्या एकत्र काम करत आल्या आहेत. पण आता ते अधिकृतपणे होईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
