एक्स्प्लोर
मारुती सुझुकीची सियाज एस कार लाँच, किंमत 9.39 लाख
मारुती सुझुकीनं सियाज एस ही नवी कार लाँच केली असून या कारची आता ह्युंदाईच्या वेरना कारशी स्पर्धा असणार आहे.
मुंबई : मारुती सुझुकीनं सियाज कारचं नवं व्हेरिएंट सियाज एस लाँच केलं आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल कारची किंमत 9.39 लाख आहे तर डिझेल कारची किंमत 11.55 लाख (एक्स शोरुम किंमत) आहे.
या कारची स्पर्धा ह्युंदाई वेरना, होंडा सिटी, स्कोडा रॅपिड या कारशी असणार आहे.
सियाजच्या या कारमध्ये नवे फीचरही देण्यात आले आहेत. या कारमधील केबिनला ऑल ब्लॅक कलर देण्यात आला आहे.
सियाज एसमध्ये रेग्युलर मॉडेल इंजिन देण्यात आलं आहे. पेट्रोल कारमध्ये 1.4 लीटर इंजिन आहे. जे 92 पीएस पॉवर आणि 130 एनएम टॉर्क आहे. तर डिझेल कारमध्ये 1.3 लीटर इंजिन असून 90 पीएस पॉवर आणि 200 एनएम टॉर्क आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
(नोट : प्रत्येक ठिकाणी कारचे दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे यासंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही डिलरशी जरुर चर्चा करा.)
स्टोरी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement