एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई, ठाणे, पुण्यातील इंटरनेटवर हल्ला
मुंबई : गेल्या काही दिवसात तुमच्या घरातल्या इंटरनेटचा स्पीड कमी होत असल्याचं तुम्हाला लक्षात आलं असेल, तर यामागच्या कारणाचा शोध पोलिसांनी लावला आहे. मुंबई, ठाणे तसंच पुण्यातील इंटरनेट सेवेवर डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस (डीडीओएस) चा हल्ला झाला आहे.
तिन्ही शहरातील इंटरनेट सेवेवर परिणाम झाला असून याप्रकरणी सायबर सेलकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. मुंबई सायबर सेलचे महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.
युझरचा आयपी अॅड्रेस हॅक करण्यासाठी हल्ला
मुंबई, पुणे आणि ठाण्यात इंटरनेट पुरवणाऱ्या आयएसपी कंपनीच्या सर्व्हरवर हल्ला झाल्याचं कळतं. यामुळे इंटरनेट वापरणारे लॉग इन अचानक वाढतात. याचा फटका बसल्याने इंटरनेट सेवा बंद होते. युझरसचा आयपी अॅड्रेस हॅक करण्यासाठी केला जातो. स्पॅमच्या माध्यमातून हे हल्ले होत असल्याने, याच्याशी निगडीत काहीही तक्रार असल्यास युझर्सनी सायबर सेलकडे संपर्क साधावा, असं आवाहन ब्रिजेश सिंह यांनी केलं आहे.
छोट्या कंपन्यांना फटका
महत्त्वाचं म्हणजे मागील काही दिवसांपासून या हल्ल्यात वाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर जगभरातून एकाच वेळी हे हल्ले होत आहेत. डीडीओएसचा हल्ला 200 गिगाहर्त्झ प्रति सेंकद या वेगाने होत आहे. त्यामुळे याचा फटका इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या छोट्या कंपन्यांना बसत आहे.
लवकरच इंटरनेट सुरळीत करु : ब्रिजेश सिंह
इंटरनेटचा स्पीड कमी झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या असनू याविरोधात कारवाई सुरु आहे. तसंच इतर संस्थांची मदत घेतली जात असल्याचं ब्रिजेश सिंह यांनी सांगितलं. तसंच लवकरच इंटरनेट सेवा सुरळीत करु, असं आश्वासनही ब्रिजेश सिंह यांनी दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement