एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लवकरच सीएनजीवर चालणाऱ्या टू व्हीलर!
नवी दिल्ली : दिल्लीतील सम-विषम फॉर्म्युलावेळी दुचाकी वाहनांवरुन मोठा गदारोळ माजला होता. सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या दुचाकी वाहनानांना सम-विषम फॉर्म्युलामधून वगळल्यानं अरविंद केजरीवालांवर टीका झाली होती. मात्र, आता थेट दुचाकी वाहनांनाच प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने पावलं उचलण्यात आली आहेत. लवकरच सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकी रस्त्यावर धावताना दिसणार असून, दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात केली आहे.
https://twitter.com/dpradhanbjp/status/745909656808218624
दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या (IGL) स्थानकातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे यावेळी उपस्थित होते. आयजीएल आणि गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मिळून ‘हवा बदलो अभियान’ सुरु केला आहे. या अभियानाअंतर्गतच सीएनजीवरील दुचाकी वाहनांची सुरुवात करण्यात आली आहे.
दुचाकी वाहनं हवा प्रदूषणाला सर्वाधिक कारणीभूत मानली जातात. दिल्लीपुरता विचार करायचा झाल्या, एकट्या दिल्लीत तब्बल 55 लाख दुचाकी आहे. 30 टक्के प्रदूषण दुचाकींमुळे होतं, असेही निदर्शनास आले आहे. दुचाकी वाहनं वापरणाऱ्यांमध्ये मध्यमवर्गीय लोक असतात. त्यामुळे सम-विषम फॉर्म्युलामधून केजरीवालांनी दुचाकींना वगळलं होतं. मात्र, त्यानंतर केजरीवालांवर टीका सुरु झाली होती.
https://twitter.com/dpradhanbjp/status/745910123567153152
जर सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकींचा प्रयोग यशस्वी झाला, तर आगामी काळात प्रदूषणावर मात करण्यासाठी रस्त्यांवक सीएनजी दुचाकी दिसतील. कमी प्रदूषण आणि अधिक मायलेज, ही सीएनजी दुचाकींचे वैशिष्ट्यं असणार आहेत.
सीएनजीमुळे 75 टक्के हायड्रो कर्बन आणि 20 टक्के कार्बन मोनो ऑक्साईडचं कमी उत्सर्जन करतं, अशी माहिती केंद्र सरकारने आपल्या जाहिरातींमधून दिली आहे. एआरएआयद्वारे स्वीकृत सीएनजी रिट्रोफिटमेंट किट असून, सीएनजी दुचाकींना एआरएआयद्वारे मान्यताही मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजी किट आय-टूक नावाच्या कंपनीने तयार केली आहे.
स्कूटरमध्ये एक-एक किलो दोन सीएनजी सिलिंडर लावलेले असतील. एकदा सिलिंडर पूर्ण भरल्यास 120 किमी प्रवास करता येणार आहे.
सध्या या स्कूटर प्रयोगासाठी डॉमिनोज पिझ्झा डिलिव्हर करणाऱ्या मुलांसाठी मोफत दिली जाणार आहेत. जवळपास 50 स्कूटरमध्ये सीएनजी सिलिंडरचा प्रयोग केला जाणार असून, डिलिव्हरी बॉय या स्कूटरचा वापर करुन रोज रिपोर्ट देतील. या रिपोर्टनुसार सीएनजी स्कूटरमध्ये बदल केले जातील, अशी माहिती मिळते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement