एक्स्प्लोर

जोकर.! हा हसवत नाही तर रडवतो; महाराष्ट्र सायबर सेलकडून सावधानतेचा इशारा

जोकर नावचं नवीन अॅप बाजारात आलं आहे. हे अॅप तुमच्या मोबाइल मधील खाजगी डेटा चोरत आहे. यामुळे अनेक लोकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पासून सावध राहण्याचा इशारा महाराष्ट्र सायबर सेलने दिला आहे.

मुंबई : जोकर नाव ऐकलं की चेहऱ्यावर हसू येतं. पण, एक जोकर असा आला आहे, जो लोकांना रडवत आहे. जोकर नावाचं अॅप बनवण्यात आलं आहे, जे तुमच्या मोबाइल मधील अँड्रॉईड अॅप वर हल्ला करत असून तुमच्या बँक खात्याची माहिती तर चोरत आहे. सोबतचं तुमचा खाजगी डेटासुद्धा चोरत आहे. सायबर विभागामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सायबर फ्रॉड करणारे दिवसेंदिवस दोन पावले पुढे जाऊन फायबर क्राइम करत आहेत. जोकर नावाचा वायरस आता तुमच्या मोबाईलमध्ये शिरू शकतो आणि तुमच्या नकळत तुमचा डेटा आणि तुमचा बँक अकाउंट लांब कुठेतरी बसलेल्या हॅकर जवळ सहज पोचू शकतो आणि याची तुम्हाला कल्पनाही लागणार नाही. जोकर व्हायरसमुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अकरा अँड्रॉइड ॲप्लिकेशनद्वारे जोकर वायरस आपल्या मोबाइलमध्ये येऊ शकतो.

कोणतंही अनोळखी अॅप डाऊनलोड करू नका हे अकरा अँड्रॉइड ॲप आपण जेव्हा डाउनलोड करतो. तेव्हा यांच्यामध्ये आधीपासून असलेल्या जोकर वायरस आपल्या मोबाईलमध्ये शिरकाव करतो आणि आपल्या मोबाईल मधील महत्त्वाच्या माहितीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मोबाईलवरुन किंवा नेट बँकिंगद्वारे केले जाणाऱ्या सगळ्या ट्रांजक्शनची माहिती लिक होऊ शकते. ज्यामुळे मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. म्हणून कुठेही ॲप डाऊनलोड करताना एकदा तपासून घ्या आणि अनोळखी नंबरद्वारे आलेला मेसेज किंवा लिंक आणि मेलवर क्लिक करू नका, असा सल्ला सायबर तज्ञ अंकुर पुराणिक यांनी दिला आहे.

Jio ने लॉन्च केला स्मार्ट Glass; आता चष्म्याच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंग

महाराष्ट्र सायबर सेलकडून सावधानतेचा इशारा ज्या 11 ॲपद्वारे आपल्या मोबाईलमध्ये हा जोकर वायरस शिरकाव करतो. त्या अॅप्लीकेशन प्ले स्टोर वरुन गुगलद्वारे डिलीट करण्यात आले आहेत. तसेच या व्हायरसचा हल्ला आपल्या बँक खात्यावर होण्याची जास्त भीती असल्याने आपले बँक खाते चेक करत राहण्याचा सल्ला महाराष्ट्र सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांच्याकडून देण्यात आला आहे. जर एखाद्याची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर त्याने सायबर सेलला त्वरित संपर्क साधून याची तक्रार नोंदवावी, अशा सूचनाही यशस्वी यादव यांनी दिल्या आहेत.

सर्वच गोष्टी मोबाइलवर सहज उपलब्द होतात. शॉपिंगपासून ते फायनेन्शल ट्रांजेक्शन करण्यापर्यंत. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचे नवनवीन प्रकार या सायबर भामट्यांकडून शोधले जात आहेत. जोकर व्हायरस हा त्यातीलच एक प्रकार आहे, ज्याच्यापासून आपण सावध राहणे आवश्यक आहे.

Data Leak | दोन कोटी 90 लाख जणांची माहिती चोरली, डार्क नेटवर माहिती विक्रीसाठी,सायबर सेलची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget