iPhone13 : 53 हजार रुपयांच्या ऑफरमध्ये 80 हजारांचा iPhone 13, जाणून घ्या Amazon ची भन्नाट ऑफर
iPhone13 Offer on Amazon : तुम्ही iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, Amazon ची होळी स्पेशल डील चुकवू नका. iPhone 13 128GB Pink वर 26 हजारांहून अधिक डिस्काउंट ऑफर आहेत.
iPhone13 Offer on Amazon : आयफोन (iPhone) प्रेमींसाठी आनंदाची बातमी आली आहे. अॅमेझॉनने (Amazon) सर्वाधिक विक्री होणाऱ्या iPhone 13 वर ग्राहकांसाठी अतिशय आकर्षक ऑफर आणली आहे. या फोनच्या किमतीवर फ्लॅट 11 हजारांची सूट दिली जात आहे. तसेच, 15 हजार रुपयांपेक्षा जास्त एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. जर या दोन ऑफर एकत्र केल्या तर तुम्ही 79,900 रुपयांचा हा फोन 53 हजार रुपयांना खरेदी करू शकता.
iPhone13 साठी Amazon ची होळी स्पेशल ऑफर
iPhone 13 ची किंमत 79,900 रुपये आहे परंतु, ऑफर 73,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर 6 हजारांपर्यंत सूट आहे. यानंतर, SBI, कोटक बँक, ICICI बँक कार्डच्या पेमेंटवर पूर्ण 6 हजार रुपये सूट आहे. म्हणजेच या फोनवर थेट 11 हजारांची सूट आहे. या फोनवर 15,400 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील आहे. या फोनवर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील आहे. ज्यामध्ये तुम्ही त्याची किंमत व्याज न भरता दरमहा हप्त्यांमध्ये भरू शकता. या फोनमध्ये 128GB, 256GB आणि 512GB चे तीन प्रकार उपलब्ध आहेत. या आयफोनमध्ये काळा, पांढरा, गुलाबी, लाल आणि निळा असे 5 रंगांचा पर्याय आहे.
आयफोन 13 चा कॅमेरा
iPhone 13 मध्ये 12MP वाइड आणि 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरासह प्रगत ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. उत्तम फोटोग्राफीसाठी, यात स्मार्ट HDR 4, नाईट मोडसह अनेक फिचर्स आहेत. या फोनवरून 4K डॉल्बी व्हिजन HDR दर्जाचे व्हिडिओ बनवता येतात. चांगल्या व्हिडिओसाठी, फोनमध्ये सिनेमॅटिक मोड आहे जो व्हिडिओ दरम्यान ऑब्जेक्टवर फोकस ठेवतो. फोनमध्ये नाईट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन HDR व्हिडिओ मेकिंग फिचर्ससह 12MP TrueDepth सेल्फी कॅमेरा आहे.
iPhone 13 चे इतर फिचर्स
या फोनची स्क्रीन 6.1 इंच आणि सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. यामध्ये 256GB रॅम आहे, फास्ट परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये A15 बायोनिक चिप आहे. फोनमध्ये iOS 15 ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत. फोनची बॅटरी देखील खूप शक्तिशाली आहे आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सतत 19 तासांपर्यंत फोन वापरता येईल. फोनमध्ये दुहेरी डिझाइनची सिरेमिक शील्ड आहे, ज्यामुळे फोन खूप मजबूत असून फोन पडल्यावर स्क्रीन लवकर तुटत नाही. फोनमध्ये मॅगसेफ वायरलेस चार्जिंगसह अनुरुप आहे आणि फोन IP68 वाटर रेसिस्टेंट आहे.
टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Apple iPhone SE 5G : लाँच झाला सर्वात स्वस्त 5G iPhone, होम बटणचा पर्याय; जाणून घ्या A to Z माहिती
- Apple iPhone SE 3 2022 : आयफोनसह 'हे' प्रॉडक्ट्स लवकरच लॉन्च होणार, कधी, कुठे, कसे? जाणून घ्या...
- Samsung Galaxy Book Pro : MacBook ला टक्कर देणारा Samsumg टचस्क्रीन लॅपटॉप, डीलमध्ये 45 टक्के सूट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha