Infinix laptop : इन्फिनिक्सचा विद्यार्थ्यांसाठी खास बजेट लॅपटॉप, 25 हजारांहून कमी किंमतीत मिळणार 'हे' भन्नाट फिचर्स
Budget laptop : इन्फिनिक्स (Infinix) या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्ड असणाऱ्या कंपनीने एक दमदार लॅपटॉप बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे हा लॅपटॉप बजेट फ्रेन्डली देखील आहे.
Infinix Inbook X1 Neo laptop : मागील काही काळापासून ऑनलाईन शिक्षण आणि विविध कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप (Laptop) ही केवळ चैनीची वस्तू राहिली नसून एक गरजेची वस्तू झाली आहे. त्यामुळे इन्फिनिक्स (Infinix) या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने खास विद्यार्थ्यांसाठी एक नवाकोरा लॅपटॉप बाजारात आणला आहे. इनबुक एक्स 1 निओ (Infinix Inbook X1 Neo laptop) असं या मॉडेलचं नाव असून याची किंमत केवळ 24 हजार 990 रुपये इतकी आहे.
सध्या ऑफिसमधील कामापासून ते आता ऑनलाईन क्लासेससाठी लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशामध्ये अनेकांना बजेट लॅपटॉप हवा असल्याने बऱ्याच नवनवीन कंपन्या लॅपटॉप बाजारात आणत आहेत. अशामध्ये इन्फिनिक्स (Infinix) या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपीनीने एक नवाकोरा बजेट लॅपटॉप बाजारात आणला आहे. इनबुक एक्स 1 निओ हा लॅपटॉप त्यांनी आता बाजारात आणला असून काही महिन्यांपूर्वी इनबुक एक्स 1 श्रेणीमध्येच इनबुक एक्स1 स्लिम (InBook X1 Slim laptop) ही कंपनी ग्राहकांसाठी घेऊन आली होती.
इनबुक एक्स 1 निओचे काय आहेत फिचर्स?
हा लॅपटॉप वजनाने हलका आणि अत्यंत शक्तिशाली लॅपटॉप म्हणून सर्वांचे लक्ष वेधत आहे. या लॅपटॉपचं वजन 1.24 किलो इतकं असून 14.8 मिमी इतकीच याची जाडी आहे. यामध्ये इंटेल सेलेरॉन क्वॉड कोअर एन5100 प्रोसेसर असून यामध्ये 8 gb रॅम आणि 256 gb मेमरी या व्हेरियंटमध्ये हा लॅपटॉप उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या लॅपटॉपचा बॅटरी बॅकअपही दमदार आहे. ज्यामुळे हा लॅपटॉप विनाव्यत्यय जवळपास 11 तासांचे वेब ब्राऊजिंग आणि 9 तासांचे नियमित काम तसंच 9 तासांचे व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकतो. या लॅपटॉपमध्ये विविध कनेक्टीव्हीटी पोर्ट्स आहेत. ज्यामध्ये दोन यूएसबी 3.0 पोर्ट्स, डेटा ट्रान्सफरसाठी दोन यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि फुल फंक्शनसाठी एक पोर्ट, एचडीएमआय 1.4 पोर्ट, एसडी कार्ड रीडर आणि 3.5 मिमी हेडरेस्ट जॅकही देण्यात आला आहे.
हे ही वाचा -