एक्स्प्लोर
ह्युंदाईची पेशकश... नवी वेरना कार लवकरच बाजारात
मुंबई: कार कंपनी ह्युंदाईनं चीनमध्ये सुरु असलेल्या चेंगदू मोटर शोदरम्यान, नवी 'वेरना' कार जगासमोर आणली आहे. चीनमध्ये नवी वेरना या वर्षाच्या शेवटपर्यंत लाँच करण्यात येणार आहे. तर भारतात 2017 पर्यंत ही कार भारतात लाँच होईल.
ही कार फ्लूडिक स्कल्पचर 2.0 डिझाइन थीमवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये फ्रंटमध्ये नव्या हैक्सागोनल ग्रिल देण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन आणि स्वेप्ट-बॅक प्रोजेक्टर हॅण्डलॅप्स आणि डे-टाइम रनिंग एलईडी लाइट देण्यात आल्या आहेत. ज्या फारच आकर्षक वाटत आहेत.
या कारच्या साईड प्रोफाइलमध्ये फार मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. यामध्ये डायमंड कट अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत.
नवी वेरना पहिल्यापेक्षा 5 एमएम लांब आणि 28 एमएम जास्त रुंद आहे. याच्या व्हीलबेसला 30 एमएमपर्यंत वाढविण्यात आलं आहे. पण याची उंची थोडी कमी करण्यात आली आहे.
नव्या वेरनामध्ये 1.4 आणि 1.6 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तसेच यामध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील असणार आहे.
सोर्स: कार देखो डॉट कॉम. ऑटोहोम चीन
Source: cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement