एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शाओमी रेडमी नोट 4 स्मार्टफोनचा युवकाच्या खिशात स्फोट
सूर्यकिरणने फोन चार्ज करुन खिशात ठेवला. बाईकने दुकानात जाताना फोनला आग लागली. त्याने तात्काळ फोन खिशातून बाहेर टाकला, तरीही काही काळ फोन जळत होता.
हैदराबाद : शाओमी कंपनीच्या रेडमी नोट 4 स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील युवकाच्या खिशातच फोनचा स्फोट झाल्याने तो जखमी झाला. अवघ्या 20 दिवसांपूर्वी फ्लिपकार्टवरुन हा फोन त्याने खरेदी केला होता.
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राऊलापालेममध्ये ही घटना घडल्याचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे. खिशात स्फोट झाल्याने सूर्यकिरण नावाच्या युवकाच्या मांडीला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच शाओमीने पुढील तपास सुरु केला आहे.
सूर्यकिरणने फोन चार्ज करुन खिशात ठेवला. बाईकने दुकानात जाताना फोनला आग लागली. त्याने तात्काळ फोन खिशातून बाहेर टाकला, तरीही काही काळ फोन जळत होता.
आमच्या ग्राहकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्यामुळे आम्ही अशा घटना गांभीर्याने घेतो, असं शाओमीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. आमच्या प्रत्येक प्रॉडक्टची क्वॉलिटी टेस्ट होते. त्यानुसार स्फोट झालेल्या फोनचीही तपासणी करण्यात येईल, असं कंपनीने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement