Instagram Reels कसे डाऊनलोड कराल?; 'या' टिप्स करतील मदत
सध्या Instagram Reels हे फिचर युजर्समध्ये खूपच प्रसिद्ध आहे. अनेकदा आवडलेले रिल्स डाऊनलोड करणं शक्य होत नाही. पण या ट्रिक वापरुन तुम्ही तुम्हाला आवडलेले रिल्स डाऊनलोड करु शकता.
मुंबई : सध्या इन्स्टाग्राम Reels युजर्समध्ये ट्रेन्डिंग आहे. जेव्हापासून टिकटॉक बंद झालं आहे, लोक इन्स्टाग्राम Reels च्या फिचरमार्फत व्हिडीओ तयार करुन अपलोड करत आहेत. सध्या लाखो लोक Instagram Reels वर व्हिडीओ तयार करुन अपलोड करताना दिसतात. आपण जेव्हा इन्स्टाग्रामवर हे रिल्स पाहतो, त्यावेळी एखादा आवडलेला व्हिडीओ डाऊनलोड करण्याची इच्छा होते. पण हे Reels डाऊनलोड करणं एवढं सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यावी लागेल. आज आम्ही तुम्हाला इन्स्टाग्राम रिल व्हिडीओ डाऊनलोड करण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत.
अॅन्ड्रॉईड युजर्स असाल तर या ट्रिक फॉलो करा
- Instagram Reels डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Video Downloader for Instagram हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.
- डाऊनलोड झाल्यानंतर हे अॅप ओपन करुन इन्स्टाग्राम आयवरुन लॉगइन करा.
- आता इन्स्टाग्रामवरील जो रिल व्हिडीओ डाऊनलोड करायचा आहे, तो सिलेक्ट करा.
- आता तुम्हाला तीन डॉट आयकॉनवर टॅप करा आणि लिंक कॉपी करा.
- आता व्हिडीओ डाऊनलोडर फॉर इन्स्टाग्राम अॅप ओपन करा आणि कॉप केलेली लिंक पेस्ट करा.
- आता फोन गॅलरीमध्ये जा, तुम्हाला डाऊनलोड केलेला Reels व्हिडीओ मिळेल.
Instagram वरील फोटो, व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल? 'या' 2 सोप्या ट्रिक
आयफोन युजर्स असाल तर या ट्रिक फॉलो करा
- अॅप स्टोअरमध्ये जाऊन InSaver for Instagram अॅप डाऊनलोड करा.
- आता अॅप ओपन करुन त्यामध्ये आयडी टाका
- आता इन्स्टाग्राम अॅपमध्ये डाऊनलोड करायचा रील व्हिडीओ सिलेक्ट करा.
- आता तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या आवडीच्या व्हिडीओची लिंक कॉपी करा.
- आता InSaver for Instagram अॅप ओपन करा, त्यानंतर URL पेस्ट करा.
- आता फोन गॅलरीमध्ये जा, तुम्हाला डाऊनलोड केलेला Reels व्हिडीओ मिळेल.
Instagram Reels
दरम्यान, Instagram ने 2020 जुलैमध्ये Instagram Reels हे फिचर लॉन्च केलं होतं. Instagram च्या Reels मध्ये तुम्ही 15 सेकेंदासाठी व्हिडीओ तयार करु शकता. याव्यतिरिक्त तुम्ही लूप व्हिडीओ क्लिपही तयार करु शकता. तुम्ही Tiktok प्रमाणे वेगळे म्युझिक किंवा क्लिप्सही जोडू शकता.
कसे तयार कराल Instagram Reels?
सर्वात आधी तुम्हाला Instagram कॅमेऱ्याच्या बॉटम साइडमध्ये Reel फिचर सिलेक्ट करावं लागेल. आता तुम्हाला स्क्रिनच्या लेफ्टमध्ये अनेक एडिटिंग टूल्स दिसतील. या इफेक्टमध्ये ऑडिओ, AR इफेक्ट, टायमर आणि काऊंडाऊन आणि स्पीड यांसारखए अनेक फिचर्स मिळतील. तसेच तुम्ही तुमच्या रिल व्हिडीओसाठी इन्स्टाग्रामच्या म्युझिक लायब्ररीचाही एक्सेस करु शकता. याव्यतिरिक्त Reel चे रेकॉर्डेड ओरिजिनल ऑडियोही तुम्ही वापरु शकता. तुम्हाला गरज असेल तर AR लायब्ररीतील सगळ्या इपेक्टचाही वापर करु शकता. हँड्स फ्री क्लिप रेकॉर्डचाही ऑप्शन देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :