(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WhatsApp ला टक्कर देण्यासाठी नवीन मॅसेजिंग अॅप, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा 'Signal'
टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्वीट करून आपल्या 41 दशलक्ष फॉलोअर्सला सिग्नल अॅप वापरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या अॅपचे वापरकर्ते झपाट्याने वाढत आहेत.
8 फेब्रुवारी 2021 पासून, WhatsApp आपले नवीन गोपनीयता धोरण बदलणार आहे. याबद्दल काही लोक विरोध दर्शवित आहेत. त्याचबरोबर काही लोक असेही म्हणतात की व्हॉट्सअॅप नाही तर कोणते अॅप वापरावे. असं कोणतं अॅप आहे, जे WhatsApp सारख्या सुविधा पुरवू शकते. त्यांच्या गरजा पूर्ण करेल आणि मुख्य म्हणजे ज्यात आपला डेटा चोरी होऊ नये अशी खात्री असेल. जाणून घेऊया अशाच एका अॅपविषयी.
एलन मस्क यांचे ट्विट
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्वीट करून आपल्या 41 दशलक्ष फॉलोअर्सला एक अॅप वापरण्याचा सल्ला दिला. हे अॅप Signal आहे. दोन शब्दांच्या या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हे ट्विट अडीच लाखाहून अधिक लोकांना आवडले असून 30 हजाराहून अधिक रिट्वीट झाले आहेत. वास्तविक सिग्नल अॅप एक इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. ज्याची टॅगलाइन वेलकम प्राइवेसी आहे. एलोन मस्क यांचे हे ट्विट अशा वेळी आले आहे जेव्हा व्हाट्सएपच्या प्रायव्हसी धोरणाचा सर्वत्र विरोध होत आहे आणि ज्या सिग्नल अॅप बद्दल बोलले जात आहे त्या गोपनीयतेचा सर्वाधिक आदर करण्याचा दावा करीत आहे.
Use Signal
— Elon Musk (@elonmusk) January 7, 2021
ट्विटनंतर वापरकर्त्यांची संख्या वाढली एलन मस्क यांच्या ट्विटनंतर सिग्नल अॅप वापरकर्त्यांची झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थिती अशी झाली आहे की कंपनीला ट्विट करुन सांगावे लागले की मोठ्या संख्येने रिक्वेस्ट येत असल्याने खाते सक्रिय करण्यात अडचणी येत आहे आणि ती लवकरच सुधारली जाईल. सुरक्षा तज्ञ, संशोधन आणि मोठ्या संख्येने पत्रकारांशी संबंधित लोक जगभरात सिग्नल वापरत आहेत, पण आता ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. मस्क व्यतिरिक्त लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते लियाद-अल-बगदादी यांनीही व्हॉट्सअॅप अॅप सोडचिठ्ठी देत सिग्नल वापरण्यास सांगितले आहे.
सिग्नल फाऊंडेशनने हे अॅप तयार केले आहे
फेसबुकने विकल्यानंतर व्हॉट्सअॅपचे सह-संस्थापक ब्रायन अॅक्टनने सिग्नल फाऊंडेशनची स्थापना केली. फेसबुक मेसेंजर प्रमाणेच हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप देखील जगातील सर्वात सुरक्षित मानले जाते.
Signal App आणि WhatsApp काय फरक आहे?
सिग्नल अॅप कोणत्याही प्रकारे वापरकर्त्याचा डेटा संकलित करत नाही तर व्हॉट्सअॅपने आता वापरकर्त्याचा डेटा संकलित करण्यास सुरुवात केली आहे. सिग्नल अॅप केवळ वापरकर्त्याचा मोबाइल नंबर घेते तर व्हॉट्सअॅप सर्व डेटा, फोन नंबर, संपर्क यादी, स्थान, संदेश एकत्रित करतो. सिग्नल अॅप आपल्या मोबाइल क्रमांकास ओळख देत नाही, तर व्हॉट्सअॅप गोळा करत असलेला डेटाद्वारे वापरकर्त्याचे प्रोफाइल तयार होईल. सिग्नल अॅपमध्ये व्हॉट्सअॅपवर असताना आपण एकमेकांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकत नाही.