Instagram वरील फोटो, व्हिडीओ कसे डाऊनलोड कराल? 'या' 2 सोप्या ट्रिक
इन्स्टाग्राम प्रायव्हसीमुळे तुम्ही कोणताही व्हिडीओ किंवा फोटो थेट डाऊनलोड किंवा सेव्ह करु शकत नाही. तरिसुद्धा जर तुम्हाला एखाद्या अकाउंटवरुन फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड करण्याची इच्छा असेल तर, तुम्ही काही ट्रिक्स वापरु शकता.

मुंबई : सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे, असं गमतीनं म्हटलं जातं. अशातच सध्या थोरामोठ्यांपासून अनेक लोक इन्स्टाग्राम आणि फेसबुक अशा सोशल मीडिया साईट्सवर अॅक्टिव्ह असल्याचं पहायला मिळतं. इन्स्टाग्रामवर लोक आपले फोटो आणि स्टोरी शेअर करतात. अशातच अनेकदा इन्स्टाग्रामचे फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करणं किंवा डाऊनलोड करण्याची इच्छा होते. परंतु, इन्स्टाग्राम प्रायव्हसीमुळे तुम्ही कोणताही व्हिडीओ किंवा फोटो थेट डाऊनलोड किंवा सेव्ह करु शकत नाही. तरिसुद्धा जर तुम्हाला एखाद्या अकाउंटवरुन फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड करण्याची इच्छा असेल तर, तुम्ही काही ट्रिक्स वापरु शकता. त्यामुळे अॅन्ड्ऱॉईड किंवा आयफोन युजर्स अगदी सहज इन्स्टाग्राम अकाउंटवरील फोटो किंवा व्हिडीओ सेव्ह आणि डाऊनलोड करु शकतात. जाणून घेऊया ट्रिक्स...
जर तुम्ही Android फोन यूजर असाल तर तुमच्यासाठी ही ट्रिक बेस्ट, खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा
1. अॅन्ड्रॉईड युजर्सनी सर्वात आधी फोनमध्ये ही लिंक Instagram+ mod apk डाऊनलोड करा आणि इन्टॉल करा. 2. आता अॅप ओपन करा, त्यानंतर तुम्हाला इन्स्टाग्रामचा Username आणि password देऊन लॉग इन करावं लागेल. 3. त्यानंतर इन्स्टाग्राम अकाउंट ओपन होईल आणि तुम्हाला जो फोटो किंवा व्हिडीओ सेव्ह करायचा असेल तो ओपन करा. 4. त्यानंतर तुम्हाला तीन डॉट्सवर क्लिक करावं लागेल, तिथेच तुम्हाला डाऊनलोडचा ऑप्शन मिळेल. 5. आता तुम्ही तुम्हाला आवडणारे फोटो किंवा व्हिडीओ सहज डाऊनलोड करु शकता.
याव्यतिरिक्त जर तुम्ही आयफोन युजर असाल किंवा एखाद्या कम्प्युटरवर इन्स्टाग्राम अकाउंट वापरत असाल आणि एखादा फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड करायचा असेल तर तुमच्यासाठी खालील खास ट्रिक फॉलो करा.
1. सर्वात आधी तुम्हाला जो फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड करायचा असेल त्याची लिंक कॉपी करा. 2. कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये यासाठी डाऊनलोड करायचा फोटो किंवा व्हिडीओ ओपन करा आता URL Copy करा. 3. त्यानंतर तुम्हाला Downloadgram.com वेबसाइट वर जाऊन कॉपी केलेली युआरएल इथे पोस्ट करा. 4. आता तुम्हाला येथे डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड्समध्ये सेव्ह होतात. 5. याव्यतिरिक्त तुम्ही गूगलमध्ये जाऊन Instagram video downloader सर्च करा. तुम्हाला अनेक वेबसाइट्सचे पर्याय मिळतील. तिथेही तुम्ही वेबसाइट ओपन करुन फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड करु शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
