एक्स्प्लोर

जाणून घ्या, Google ला कशी सापडतात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

गुगल नेमकी आपल्या प्रश्नांची उत्तरं कसं शोधतं आणि त्याची सर्व उत्तरं योग्यच असतात का, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? चला तर मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी गुगलकडे न जाता खालील माहिती वाचूया.

नवी दिल्ली : एखादा असा प्रश्न, ज्याचं उत्तर देण्यासाठी आपणही असमर्थ असतो त्यावेळी आधार घेतला जातो तो म्हणजे एका खात्रीशीर मदतीचा, तंत्रज्ञानाचा. Google या नावानं हे तंत्रज्ञान, अर्थात हे सर्च इंजिन असंख्य प्रश्नांची उत्तरं देत, कित्येक गोष्टींबाबतची माहिती देत तुमच्या आमच्या शंकांचं निरसन करत असतं. त्यामुळं प्रश्न कोणताही असो, उत्तर देण्यासाठी गुगल आहे ना असं म्हणत आपण मात्र निर्धास्त असतो. गुगल नेमकी आपल्या प्रश्नांची उत्तरं कसं शोधतं आणि त्याची सर्व उत्तरं योग्यच असतात का, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? चला तर मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी गुगलकडे न जाता खालील माहिती वाचूया. Google असं देतं तुमच्या प्रश्नांची उत्तरं... Crawling कोणत्याही विषयाबाबत जेव्हा आपण गुगलवर जाऊन माहिती शोधतो, तेव्हा Google सर्वप्रथन वेब पेजवर त्या विषयाशी निगडीत माहिती उपलब्ध आहे का हे तपासतं. या प्रक्रियेला Crawling असं म्हणतात. क्रॉलिंगसाठी Google bot चा वापर केला जातो. ज्यामध्ये Google पेजेसना क्रॉ़ल करत नव्या पेज इंडेक्समध्ये जोडतं. Google bot हे एक वेब क्रॉलर्स सॉफ्टवेअर आहे. क्रॉलर्स एकमेकांकडून माहिती मिळवून ती Googleच्या सर्व्हरपर्यंत आणतात. Indexing Crawlers च्या माध्यमातून वेबपेज मिळण्यानंतर Google ची सिस्टीम वेगवेगळ्या पेजवरील माहिती तपासतं. यामध्ये फोटो, व्हिडीओ आणि वेब कंटेंटचा समावेश असतो. क्रॉल केलेले पेज Google पडताळून पाहतं. यामध्ये किवर्ड्स आणि वेबसाइट कंटेंटवर भर दिला जातो. याशिवाय वेबसाइट कंटेंटमध्ये कितपत नावीण्य आहे, माहिती क़ॉपी -पेस्ट तर नाही ना याचीही माहिती घेतली जाते. एकसारखाच कंटेंट असल्याच ती रद्द करण्यात येते. ही सर्व माहिती Google Index मध्ये साठवली जाते. WhatsApp वरुन पेमेंट सुविधा सुरू; सेटअप अ‍ॅक्टीव कसे करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप Serving result आपण गुगलवर कोणतीही माहिती शोधल्यास गुगल आपल्याला त्याच्याशी निगडीत प्रश्न आणि उत्तरही सुचवतं. यामध्ये सर्वात वर सर्च पेज रँक असतं. या पूर्ण प्रक्रियेशिवायही गुगल आपल्या इंटरनल प्रोसेसरचीही मदत घेतो. ज्यानंतर Google तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी काही सेकंदातच देतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget