एक्स्प्लोर
Advertisement
'हॉटस्टार' भारतातील सर्वाधिक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म, देशातील मोठ्या शहरांमध्ये 'नेटफ्लिक्स'ला पसंती
'काउंटरपॉइंट रिसर्च' या संस्थेने केलेल्या रिसर्चनुसार Hotstar हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म ठरला आहे.
'हॉटस्टार' हा भारतातील सध्याचा सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. 'काउंटरपॉइंट रिसर्च' या संस्थेने केलेल्या रिसर्चनुसार भारतातील लोकांची सर्वाधिक पसंती हॉटस्टारला आहे. त्यानंतर अॅमेझॉन प्राइम आणि सोनी लिव्हचा या यादीत क्रमांक येतो. देशातील मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असूनही नेटफ्लिक्सचा देशभरातील क्रमवारीत मात्र चौथा क्रमांक आहे. भारतातल्या टॉप 5 मेट्रो शहरातील युजर्सपैकी 65 टक्के लोक नेटफ्लिक्स वापरत असल्याचे सर्वेमध्ये समोर आले आहे.
क्रिकेट मॅचेसच्या स्ट्रिमिंगमुळे हॉटस्टारची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचं देखील या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हॉटस्टारचे 56 टक्के युजर्स हे मेट्रो शहरातील असल्याचं देखील यात म्हटलं आहे. हॉटस्टारवरील कंटेंटसाठी पैसे द्यावे लागत असले तरी पैसे न भरता फक्त ठराविक कंटेंट पाहण्याचीही सोयदेखील या प्लॅटफॉर्मवर आहे. अशा प्रकारे कंटेंट पाहणाऱ्यांचीही संख्या हॉटस्टारकडे मोठ्या प्रमाणात आहे.
'काउंटरपॉइंट रिसर्च'च्या या सर्वेनुसार स्मार्ट टिव्हीवर कंटेंट पाहणाऱ्यांमध्ये 'इरॉस नाऊ'चं प्रमाण सर्वाधिक आहे. इरॉस नाऊचे जवळपास 27 टक्के युजर्स स्मार्ट टिव्हीवर कंटेंट पाहणं पसंत करतात. भारतातील ओटीटी युजर्ससाठी 'रिलायन्स जिओ' हे सर्वात लोकप्रिय मोबाईल नेटवर्क असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जिओनंतर एअरटेल आणि वोडाफोन-आयडीया चा क्रमांक लागतो.तसेच भारतातील ओटीटी युजर्सपैकी 90 टक्के युजर्स 35 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत, असं देखील या सर्वेमध्ये समोर आलं आहे.
गेल्या काही वर्षांत मोबाईल डेटा पॅकच्या किंमती कमी झाल्या आहेत. तसेच 4 जी सेवेचं जाळं देशभर पसरल्यानंतर इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. स्मार्टफोन आणि हायस्पीड इंटरनेट यामुळे मोबाईलवर सिनेमा, टिव्ही सिरीज पाहण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement