एक्स्प्लोर
होंडाची नवी 'सिटी' कार लाँच, अवघ्या 21 हजारात बुकींग

मुंबई: होंडानं आपली 'सिटी' ही कार नव्या स्वरुपात बाजारात आणली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. या कारचची किंमत 8 लाख 49 हजार 999 रुपयांपासून 13 लाख 56 हजार 990 रुपयांपर्यंत असणार आहे. होंडानं ही कार आज लाँच केली आहे. तसेच या कारची प्री-बुकींगही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे 21,000 रुपयात ही कार तुम्ही बूक करु शकता. होंडानं या कारमध्ये बरेच बदल केले आहेत. या कारचा फक्त बाहेरुनच लूक बदलला नाही तर आतही बदल करण्यात आले आहेत. नवी सिटी कारच्या खास गोष्टी: - डिझेल व्हर्जन कारची किंमत 10 लाख 76 हजार ते 13 लाख 57 हजार असणार आहे. - पेट्रोल व्हर्जन कारची किंमत 8 लाखांपासूनते 13 लाख 53 हजारांपर्यंत असणार आहे. - या कारची सियाज, वेरना, वेंटा आणि स्कोडा यांच्याशी स्पर्धा असणार आहे. - होडांनं 1996 साली सिटी ब्रांड लाँच केली होती. त्यानंतर 2 वर्षात भारतात ही कार लाँच करण्यात आली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
अहमदनगर























