एक्स्प्लोर
Advertisement
जवानांच्या तक्रारीसाठी आता मोबाईल अॅप, गृहखात्याची माहिती
दिल्ली : जवानांच्या तक्रारीचे एकापाठोपाठ एक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं आता त्यावर एक नवा टेक्नोसॅव्ही उपाय शोधला आहे. पॅरामिलिट्री फोर्समधल्या सगळ्या जवानांनासाठी आता अशा तक्रारी नोंदवण्यासाठी एक खास अॅपचं तयार करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून पॅरामिलिटरी फोर्समधील जवानांना आपल्या तक्रारी थेट गृहखात्यापर्यंत पोहोचवता येतील.
त्यासंदर्भातले आदेश एनआयसी अर्थात नॅशनल इन्फॉर्मेशन कमिशनला देण्यात येणार आहेत. या अॅपच्या माध्यमांतून जवान त्यांच्या कुठल्याही तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहचवू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय अशा तक्रारींमध्ये पारदर्शकता येऊन त्यांचा फॉलोअप घेणंही सोपं होणार आहे. अर्थात त्यासाठी सर्व जवानांना त्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करुन घ्यावं लागणार आहे.
ज्या परिस्थितीत, ज्या दुर्गम भागात हे जवान काम करतात, तिथे त्यांना इंटरनेटची रेंज पोहचणार का असे काही प्रश्नही मात्र विचारले जात आहेत. या सर्व प्रश्नांचा विचार करुनच हे पाऊल उचलणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement