एक्स्प्लोर
आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसांची करडी नजर
महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई : व्हॉट्सअॅप न वापरणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी देशात फारच कमी असेल. प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅपवर ढिगानं ग्रुप असतात. शाळेचे, कॉलेजचे, कार्यालयातले, मित्रांचे असे प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप. पण आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आणखी एक जण अॅड होणार आहे. तो आहे पोलिसमामा.
एक अफवा... 11 घटना... 7 जणांची हत्या... 16 जण जखमी
महाराष्ट्रात अफवांचं पीक गाजर गवतासारखं पसरलं आणि त्याला कारण ठरले आहेत व्हॉट्सअॅपवरुन पसरणारे अविचारी फॉरवर्ड्स. कोणतीही शहानिशा न करता मेसेज एका सेकंदात फॉरवर्ड होतो. पण त्याचे परिणाम काय होतील याचा कुणीही विचार करत नाही. म्हणूनच आता महाराष्ट्र पोलिसांनी शक्कल लढवली आहे
महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आता पोलिसच आपल्या ग्रुपमध्ये असल्यानंतर अॅडमिनपासून मेबर्सवर करडी नजर राहणार आहे... आणि जो अफवा पसरवेल... त्याची खैर नाही.
जगभरात व्हॉट्सॅप यूजर्सची संख्या 150 कोटींच्या घरात आहे. त्यातले तब्बल 20 कोटी ग्राहक हे भारतातले आहेत... एका आकडेवारीनुसार जगभरातले यूजर्स रोज 6 हजार कोटी मेसेज पाठवतात. त्यात भारत हा सर्वात आघाडीवर आहे. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता ग्रुपची संख्याही भारतात सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सॅपच्या निर्मात्याने आपल्या या मेसेंजर सर्व्हिसमुळे काही लोकांचे मुडदे पडतील असा विचार स्वप्नातही केला नसेल. त्यामुळे आपल्याला अपडेट करणारं तंत्रज्ञान तर मिळालं, पण अपग्रेड करणारी अक्कल मात्र आली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
