एक्स्प्लोर
जगातील लोकप्रिय 'नेक्सस'च्या नव्या स्मार्टफोनचा लॉन्चिंग मुहूर्त ठरला!
नवी दिल्ली: गूगलने 4 ऑक्टोबर रोजी एका मोठ्या इव्हेंटचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी कंपनीने निमंत्रणही पाठवणे सुरु केले असून या इव्हेंटमध्ये 'नेक्सस' स्मार्टफोन डिव्हाइसच्या नव्या व्हर्जनचे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. हा कार्यक्रम सॅन फ्रान्सिसकोमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
हे नवे स्मार्टफोनचे डिव्हाइस HTC ने बनवले आहेत. एका लीक रिपोर्टनुसार या नव्या स्मार्टफोनची नावे HTC पिक्सल (कोडनेम-सॅल्फिश) आणि HTC पिक्सल XL (कोडनेम-मार्लिन) असतील. हे दोन्ही स्मार्टफोनचा लूकही वेगळा असेल.
टेक वेबसाइट अॅन्ड्रॉयड हेडलाईन डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, HTC पिक्सल XL (कोडनेम-मार्लिन) हा नुकताच गीक बेंचमार्कमध्ये लिस्ट झाला होता. यावेळी यासंदर्भात काही माहितीही देण्यात आली होती. यामध्ये या नव्या स्मार्टफोनचे नाव 'मार्लिन' असे सांगण्यात आले होते.
HTC पिक्सल XL या स्मार्टफोनची बॉडी अॅल्यूमिनयम असेल. तसेच फिंगर प्रिंट स्कॅनर आणि 5.5 इंचाची स्क्रिन असेल.
लीक रिपोर्टनुसार, पिक्सल XL क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरने युक्त असणार असून याची क्षमता 1.69GHz असेल. याशिवाय यामध्ये 4GB रॅम असेल. हा स्मार्टफोन गूगलच्या अॅन्ड्रॉयड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement