एक्स्प्लोर

गुगलवर 2017 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टी

आपल्याला हव्या असलेल्या जवळच्या गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र पोस्ट ऑफिस यामध्ये सर्वाधिक वेळा सर्च केलं गेलंय.

मुंबई : तुम्हाला जेव्हा काही सुचत नसेल, काही माहित नसेल, कुठे जायचं असेल, कुणाविषयी माहिती पाहिजे असेल, तर हे सगळं एका क्षणात मिळवण्याचं माध्यम म्हणजे जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेलं गुगल. गुगलवर आपण आपल्याला हवं ते सर्च करु शकतो. या वर्षामध्येही अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्या. मात्र काही गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात, की या गोष्टी का सर्च केल्या असतील. आम्ही तुम्हाला 2017 या वर्षामध्ये सर्वात जास्त सर्च केलेल्या विविध क्षेत्रातील गोष्टींची माहिती देणार आहोत. आपल्याला हव्या असलेल्या जवळच्या गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र पोस्ट ऑफिस यामध्ये सर्वाधिक वेळा सर्च केलं गेलंय. एवढ्या कुरिअर सुविधा असतानाही पोस्ट ऑफिस सर्वाधिक वेळा सर्च केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटू शकतं. मात्र यामागे कारणही तसंच आहे. कनेक्टीव्हीटी एवढी वाढली आहे, की पोस्ट ऑफिस हा प्रकार हल्ली कुणाच्या लक्षातच राहिलेला नाही. त्यामुळेच आपल्या भागात पोस्ट ऑफिस कुठे आहे, हे सर्वाधिक वेळा सर्च केलं आहे.
  • सर्वाधिक सर्चिंग कशासाठी?
2017 या वर्षातला मच अवेटेड सिनेमा बाहुबली 2 ची माहिती जाणून घेण्यासाठी युझर्सने सर्वाधिक वेळा गुगलचा वापर केला आहे. बाहुबली 2 सर्वाधिक वेळा सर्च केला आहे. त्यानंतर आयपीएलचा क्रमांक आहे. लाईव्ह क्रिकेट स्कोअर, दंगल सिनेमा आणि हाफ गर्लफ्रेंड सिनेमा अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.
  1. बाहुबली 2
  2. इंडियन प्रीमिअर लीग
  3. लाईव्ही क्रिकेट स्कोअर
  4. दंगल
  5. हाफ गर्लफ्रेंड
  6. बद्रीनाथ की दुल्हनिया
  7. मुन्ना मायकल
  8. जग्गा जासूस
  9. चाम्पियन्स ट्रॉफी
  10. रईस
  • निअर मी
जवळचं सिनेमागृह, कॉफी शॉप, हॉटेल आणि इतर आवश्यक गोष्टी आपण गुगलवर शोधता. यामध्ये पोस्ट ऑफिस सर्वाधिक वेळा सर्च केलं गेलंय. त्यानंतर सिनेमाचं वेळापत्रक जास्त वेळा सर्च करण्यात आलं. तर जवळचे कॉफी शॉप, कुरिअर सर्व्हिस आणि Things to do अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे एटीएम, औषधं या महत्त्वाच्या गोष्टीही तळाला आहेत. Near me..
  1. पोस्ट ऑफिस
  2. सिनेमाची वेळ
  3. कॉफी शॉप
  4. कुरिअर सर्व्हिस
  5. Things to do
  6. हार्डवेअर स्टोअर
  7. इलेक्ट्रॉनिक स्टोअर
  8. ग्रोसरी स्टोअर
  9. जवळचं एटीएम
  10. जवळचं मेडीकल
  • कसं करायचं?
तुम्हाला एखादी गोष्ट करता येत नसेल तर मदत घेण्यासाठी स्वाभाविकपणे गुगलची मदत घेतली जाते. तर यामध्ये आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक कसं करायचं, हे सर्वाधिक वेळा आणि त्यानंतर जिओ फोन बुक कसा करायचा हे सर्च करण्यात आलं आहे. How to…
  1. आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक कसं करायचं?
  2. जिओ फोन बुक कसा करायचा?
  3. भारतात बिटकॉईनची खरेदी कशी करायची?
  4. स्क्रीनशॉट कसा काढायचा?
  5. चेहऱ्यावरील होळीचा रंग कसा काढायचा?
  6. जीएसटी रिटर्न कसा भरायचा?
  7. म्युच्युअल फंड गुंतवणूक
  8. विकीपीडिया कसा बनवायचा?
  9. बिग बॉस 11 साठी मत कसं नोंदवायचं?
  10. भारतात इथेरम कसं खरेदी करायचं?
  • सनी लिओनी गेल्या पाच वर्षांपासून टॉप सर्चमध्ये कायम
गुगलच्या सर्चमध्ये सर्वाधिक वेळा सर्च केल्या गेलेल्या मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींमध्ये अभिनेत्री सनी लिओनी गेल्या पाच वर्षांपासून कायम आहे. तिच्यानंतर अभिनेत्री अर्शी खानचा क्रमांक लागतो. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकमध्ये झळकलेली अभिनेत्री दिशा पटाणीनेही टॉप 5 मध्ये प्रवेश मिळवला आहे. मनोरंज क्षेत्रातील व्यक्ती
  1. सनी लिओनी
  2. अर्शी खान
  3. सपना चौधरी
  4. विद्या वॉक्स
  5. दिशा पटाणी
  6. सुनील ग्रोव्हर
  7. शिल्पा शिंदे
  8. बंदगी कलरा
  9. सागरिका घाटगे
  10. राणा दगुबत्ती
  • ... म्हणजे काय?
तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अर्थ किंवा माहिती नसेल तर ते शोधण्यासाठी गुगल हा सोपा पर्याय आहे. भारतात जीएसटी म्हणजे काय, हे या वर्षात सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलं आहे. त्यानंतर बिटकॉईनची माहिती सर्वाधिक लोकांनी जाणून घेतली आहे. दरम्यान प्रदूषणामुळे देशभरातील BS3 वाहनांच्या विक्रीवर बदी घालण्यात आली होती. त्याबाबतही सर्च करण्यात आलं आहे.
  1. जीएसटी म्हणजे काय?
  2. बिटकॉईन म्हणजे काय?
  3. जलीकट्टू म्हणजे काय?
  4. BS3 वाहनं म्हणजे काय?
  5. पेटा म्हणजे काय?
  6. जिओ प्राईम म्हणजे काय?
  7. कॅसिनी म्हणजे काय?
  8. फिजेट स्पीनर म्हणजे काय? ल्युनर एक्लिप्स म्हणजे काय?
  9. रॅन्समवेअर म्हणजे काय?
  • सर्वाधिक वेळा सर्च केलेला सिनेमा
  1. बाहुबली 2
  2. दंगल
  3. हाफ गर्लफ्रेंड
  4. बद्रीनाथ की दुल्हनिया
  5. मुन्ना मायकल
  6. जग्गा जासूस
  7. रईस
  8. फास्ट अँड फ्युरियस 8
  9. राबता
  10. ओके जानू
  • सर्वाधिक वेळा सर्च केलेली गाणी
  1. हवा हवा
  2. रश्के कमर
  3. डिस्पॅचिओ
  4. दिल दिया गलन
  5. राबता
  6. डिंग डँग
  7. काबिल
  8. शेप ऑफ यू
  9. मुबारकन
  10. मिले हो तुम हम को
  • क्रीडा कार्यक्रम
  1. आयपीएल
  2. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
  3. विम्बल्डन
  4. WWE Wrestlemania
  5. प्रो कबड्डी
  6. यूएस ओपन
  7. फिफा वर्ल्डकप
  8. रॉयल रम्बल
  9. आयसीसी महिला विश्वचषक
  10. इंडियन सुपर लीग
  11.  BS3 वाहनं
  • बातम्या
  1. आयपीएल
  2. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
  3. सीबीएसईचा निकाल
  4. उत्तर प्रदेश निवडणूक
  5. जीएसटी
  6. विम्बल्डन
  7. मिस वर्ल्ड निवडीचा कार्यक्रम
  8. बिटकॉईनची किंमत
  9. केंद्रीय अर्थसंकल्प
  10. यूएस ओपन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget