एक्स्प्लोर

आता गुगल योग्य उच्चार करायला शिकवणार; जाणून घ्या खास फिचर

बऱ्याचदा आपल्याला काही शब्द उच्चारणं कठिण जातं. मग शब्दाचा उच्चार शोधण्यासाठी धडपड सुरु होते. अशातच आता आपले उच्चार सुधारण्यासाठी गुगलने पुढाकार घेतला आहे. गुगल नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. आताही गुगलने असचं एक फिचर लॉन्च केलं आहे.

मुंबई : बऱ्याचदा आपल्याला काही शब्द उच्चारणं कठिण जातं. मग शब्दाचा उच्चार शोधण्यासाठी धडपड सुरु होते. अशातच आता आपले उच्चार सुधारण्यासाठी गुगलने पुढाकार घेतला आहे. गुगल नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. आताही गुगलने असचं एक फिचर लॉन्च केलं आहे. यामध्ये एखाद्या शब्दाचा योग्य उच्चार समजून घेणं शक्य होणार आहे. गुगलने गुगल सर्चसाठी एक फिचर लॉन्च केलं आहे. या फिचर अंतर्गत आपले उच्चार (Pronunciation)योग्य आहेत की नाही हे समजणं शक्य होणार आहे. याआधी या फिचरचा वापर गुगल सर्च करून एखाद्या शब्दाचा योग्य उच्चार ऐकण्यासाठी करण्यात येत होता. पण आता हे फिचर वापरून योग्य शब्द उच्चारताही येणार आहे. याच फिचरमध्ये यूजर्सना स्पिक नाऊ हा पर्याय उपलब्ध असणार आहे. गुगलने या फिचरसाठी मशीन लर्निंगचा वापर केला आहे. एखाद्या शब्दाचं प्रोनाउनसेशन कसं करावं, हे आर्टिफिशिअल इंटेलिजेंसमार्फत अॅनालाइज केलं जातं. गुगलचं स्पीच रेकग्निशन टूल उच्चारलेला शब्द प्रोसेस करून तो एक्सपर्ट्सच्या उच्चारासोबत मॅच करणार आणि त्यानंतर शब्दाचा योग्य उच्चार सांगणार. तुम्हाला ज्या शब्दाचा उच्चार कठिण वाटतो, तो शब्द सर्च करा. तिथे तुम्हाला स्पिक नाऊ असा पर्याय मिळेल. माइक आयकॉनवर टॅप करून तुम्ही तो शब्द बोलू शकता. तुम्ही तो शब्द उच्चारल्यानंतर गुगलचं नवीन फिचर तुम्हाला सांगेल की, तुम्ही त्या शब्दाचा उच्चार बरोबर केला की, नाही. तसेच तो शब्द उच्चारताना तुमची काय चूक होत आहे आणि ती चूक तुम्ही कशी सुधारू शकता, याबाबतही हे फिचर तुमचं मार्गदर्शन करणार आहे. सध्या हे फिचर फक्त इंग्रजी भाषेसाठी उपलब्ध आहे. कंपनीने असं सांगितलं आहे की, येणाऱ्या काळात हे फिचर इतरही भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येईल. गुगलने सांगितलं की, हे फिचर एक्सपरिमेंटल असून सध्या हे फक्त मोबाईलसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. तसेच या फिचरमध्ये अनेक सुधारणा करण्याचं काम सुरु असून काही ऑप्शन्सही जोडण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त गुगलने या फिचरसोबत वर्ड ट्रान्सलेशन आणि डेफिनेशनमध्येही काही बदल केले आहेत. आता तुम्ही जर एखादा शब्द ट्रान्सलेट केला तर गुगल त्या शब्दाशी निगडीत इमेजेससुद्धा तुम्हाला दाखविणार आहे. याबाबत बोलताना कंपनीने सांगितले की, सध्या पिक्चर ट्रान्सलेशन हे फिचर फक्त इंग्रजी भाषेसाठीच काम करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget