Google Photos : डिलीट झालेले फोटो परत मिळवायचेत? ट्राय करा 'ही' सोपी ट्रिक
अनेक वेळा आपल्याकडून फोनमधील फोटो डिलीट होतात.
Google Photos: एखाद्या व्यक्तिची किंवा ठिकाणाची आठवण म्हणून आपले खास फोटो आपण मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवतो. अनेक वेळा मोबाईलची मेमरी जास्त झाल्याने आपण फोनमधील काही फोटो डिलीट करतो. हे फोटो लिडीट करताना अनेक वेळा आपल्याकडून फोनमधील काही महत्वाचे फोटो चूकुन डिलीट होतात. टेक जाअॅंट त्यांच्या यूजरला Google Photos असे एक फिचर देतात, ज्याच्या मदतीने तुम्ही डिलीट झालेले फोटो पुन्हा मिळवू शकता. या फिचरचा वापर करून तुम्ही दोन महिन्याच्या आत डिलीट केलेले फोटो पुन्हा रीस्टोर करू शकता. जाणून घ्या डिलिट झालेले फोटो परत मिळवण्याची सोपी पद्धत
Amazon Great Indian Festival Sale: फक्त 10 हजारात मिळवा उत्तम क्वॉलिटीचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन
परत मिळवा डिलीट केलेले फोटो आणि व्हिडीओ
Google Photos मध्ये डिलीट झालेले फोटो पुन्हा मिळवण्यासाठी सर्वांत पहिल्यांदा Google Photos चे अॅप सुरू करा
त्यानंतर वरच्या डाव्या बाजूला असलेल्या चिन्हावर जाऊन ट्रॅशच्या ऑप्शनला सिलेक्ट करा.
त्यानंतर ज्या फोटोला रिस्टोर करायचे असेल त्यावर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करा.
हे करून झाल्यावर रीस्टोरवर क्लिक करा.
रीस्टोर सिलेक्ट केल्यानंतर आपले डिलीट झालेला फोटो अॅपमध्ये पुन्हा येतील.
असे लॉक करा फोटो
Locked Folder चा वापर करत असताना यूजरला सर्वांत पहिले गूगल फोटोजच्या लायब्ररीमध्ये जावे लागेल.
लायब्ररीमध्ये गेल्यानंतर Utilities ऑप्शनवर टॅप करा.
तुम्ही टॅप केल्यानंतर तुम्हाला Locked Folder चे ऑप्शन दिसेल.
त्यानंतचर तुम्ही या फोल्डरमध्ये तुमचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकता.
यामध्ये तुम्ही पासवर्ड देखील लावू शकता. त्यामुळे या फोटो आणि व्हिडीओला कोणही पाहू शकणार नाही.