एक्स्प्लोर
‘डॉन’समोर गूगल नतमस्तक
सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत फलंदाजीत 99.4 सरासरी गाठली. क्रिकेट जगतात एवढी सरासरी गाठणारा आणि त्यात सातत्य ठेवणारा महान फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे.
मुंबई : क्रिकेट जगताचा ‘डॉन’ अर्थात सर डॉन ब्रॅडमन यांचा आज जन्मदिन. इंटरनेट जगतातील जायंट मानल्या जाणाऱ्या गूगल सर्च इंजिनने ब्रॅडमन यांच्या जन्मदिनानिमित्त डूडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. “ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांचा हिरो आणि क्रिकेट जगातातील महान फलंदाज अर्थात ‘द डॉन’”, असे गूगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स येथील कूटामुंद्रा येथे डॉन ब्रॅडमन यांचा 27 ऑगस्ट 1908 रोजी जन्म झाला. आज सर डॉन ब्रॅडमन यांची आज 110 वी जयंती आहे.
क्रिकेटचा इतिहास सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. क्रिकेट जगतातील महान फलंदाज ठरलेल्या ब्रॅडमन यांना आजही सर्व क्रिकेटर आणि क्रिकेट चाहते सर्वोच्च मानतात. त्यांच्या कारकीर्दीविषयी आजही मोठं कुतुहूल आहे.सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत फलंदाजीत 99.94 सरासरी गाठली. क्रिकेट जगतात एवढी सरासरी गाठणारा आणि त्यात सातत्य ठेवणारा महान फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. 21 वर्षांच्या मोठ्या कारकीर्दीत सर डॉन ब्रॅडमन यांनी प्रत्येक तीन सामन्यांमागे एका शतकांची नोंद केली. 52 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 6,996 धावांची नोंद त्यांच्या नावावर आहे.
ऑस्ट्रेलियातील केन्सिंग्टन पार्क येथे 25 फेब्रुवारी 2001 रोजी सर डॉन ब्रॅडमन यांचं निधन झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement