एक्स्प्लोर

Bhupen Hazarika, Google Doodle : संगीतकार भूपेन हजारिका यांची 96 वी जयंती; गुगलकडून खास डूडल!

सर्च इंजिन गुगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवले आहे. या खास डूडलद्वारे त्यांनी भूपेन हजारिका यांना मानवंदना दिली आहे.

Bhupen Hazarika : आज संगीतकार, गीतकार आणि लेखक भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांची 96 वी जयंती आहे. याच दिवसाचं निमित्त साधून सर्च इंजिन गुगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवले आहे. या खास डूडलद्वारे त्यांनी भूपेन हजारिका यांना मानवंदना दिली आहे. भूपेन हजारिका यांचा जन्म 08 सप्टेंबर 1926 रोजी आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सादिया येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव नीलकांत आणि शांतीप्रिया होते. भूपेन यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...

वयाच्या दहाव्या वर्षी रेकॉर्ड केलं पहिलं गाणं
बालपणी भूपेन हजारिका यांना संगीताची आवड निर्माण झाली.  भूपेन हजारिका यांच्या संगीताने प्रख्यात आसामी गीतकार ज्योतिप्रसाद अग्रवाला आणि चित्रपट निर्माते बिष्णू प्रसाद राभा यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी भूपेन हजारिका यांना त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड करण्यास मदत केली, तेव्हा भूपेन हजारिका हे 10 वर्षांचा होते. वयाच्या 12 व्या वर्षी भूपेन हजारिका हे इंद्रमालती: काक्सोते कोलोसी लोई आणि बिस्वो बिजॉय नौजवान या दोन चित्रपटांसाठी गाणी लिहित आणि रेकॉर्ड करत होते.

पुरस्कारांनी गौरव 
भूपेन हजारिका यांचा अनेक पुरस्कारानं गौरव करण्यात आला. 1975 मध्ये उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच 1987 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1977 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. 2012 मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण आणि 2019 मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. भूपेन हजारिका यांनी 05 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

गुगलचं खास डूडल

भूपेन हजारिका यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डूडल बनवलं आहे. या डूडलमध्ये भूपेन हजारिका हे पेटी वाजवताना दिसत आहेत. तसेच त्यांच्यासमोर एक माईक देखील आहे. मुंबईतील रुतुजा माळीनं या गुगल डूडलचं illustration तयार केलं आहे. गुगलच्या या डूडलद्वारे भूपेन हजारिका यांना मानवंदना देण्यात आली आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget