एक्स्प्लोर

Google Doodle, Anna Mani : भारताच्या ‘वेदर वुमन’ अ‍ॅना मणी यांची 104वी जयंती, गुगलकडून खास डूडल!

Anna Mani : आज 23 ऑगस्ट 2022, भारताच्या ‘वेदर वुमन’ (Weather Woman Of India) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅना मणी (Anna Mani) यांची 104वी जयंती आहे.

Anna Mani : आज 23 ऑगस्ट 2022, भारताच्या ‘वेदर वुमन’ (Weather Woman Of India) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅना मणी (Anna Mani) यांची 104वी जयंती आहे. याच दिवसाचं निमित्त साधून सर्च इंजिन गुगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवले आहे. या खास डूडलद्वारे त्यांनी अ‍ॅना मणी यांना मानवंदना दिली आहे. हवामान निरीक्षण यंत्रांच्या रचनेत अ‍ॅना मणी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बनवलेली हवामान निरीक्षण यंत्र भारतातील हवामानाच्या पैलूंचे मोजमाप करण्यात आणि अंदाज व्यक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

अ‍ॅना मणी यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी केरळ राज्यातील पीरुमेडू येथे झाला. भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ अ‍ॅना मणी यांना ‘भारताच्या वेदर वुमन’ म्हणूनही ओळखले जाते. मणी यांच्या संशोधनामुळेच आजघडीला भारतातील हवामानाचा अंदाज बांधणे शक्य झाले आहे. अ‍ॅना मणी यांच्या हवामानशास्त्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी गुगलने त्यांच्या 104व्या वाढदिवसानिमित्त एक विशेष डूडल समर्पित केले आहे.

अ‍ॅना मणी यांची ओळख

अ‍ॅना मणी या भारतातील आघाडीच्या महिला वैज्ञानिकांपैकी एक होत्या. त्यांनी भारतीय हवामान विभागाच्या उपमहासंचालक पदाची धुरा संभाळली होती. सौर किरणोत्सर्ग, ओझोन आणि पवन ऊर्जा उपकरणे या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अ‍ॅना मणी यांनी आपल्या कामाची सुरुवात भारतीय हवामान खात्यात लिपिक म्हणून केली होती. त्यांचा हा प्रवास मेहनतीच्या जोरावर उपमहासंचालक पदापर्यंत पोहोचला. जगात जेव्हा पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात फारसे संशोधन होत नव्हते, तेव्हा मणी यांनी भारतात सौर आणि पवन ऊर्जेवर काम केले.

सुरुवातीला त्यांना वैद्यकीय क्षेत्रात जायचे होते. पण, हळूहळू भौतिकशास्त्रात त्यांना जास्त रुची वाटू लागली. यामुळेच त्यांनी चेन्नई येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात पदवी (ऑनर्स) मिळवली. त्यानंतर त्यांना बंगळूरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. इथे त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सर सीव्ही रामन यांच्या मार्गदर्शनाखाली हिरे आणि माणिक यांच्या ऑप्टिकल गुणधर्मांवर संशोधन केले. मात्र, भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी नसल्याने त्यांना पीएचडी नाकारण्यात आली.

हवामान क्षेत्रात मोठं योगदान

रमण यांच्या प्रयोगशाळेत तीन वर्षे काम केल्यानंतर त्या भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे त्यांना हवामान यंत्रांच्या विकासासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. लंडनमधील इम्पीरियल कॉलेजमध्ये त्यांनी हवामानशास्त्रीय उपकरणांचा अभ्यास केला. भारतात परतल्यानंतर त्या पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागात हवामानशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाल्या. इथेच त्यांनी हवामानशास्त्रीय उपकरणांचे डिझाईन बनवण्यास सुरुवात केली. हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी देशभर निरीक्षण केंद्रेही स्थापन केली.

मणी यांनी 1960मध्ये वातावरणातील ओझोन मोजण्याचे काम सुरू केले. वातावरणातील ओझोन मोजण्यासाठी ‘ओझोनसोंड’ हे उपकरण तयार केले. मणी यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना आंतरराष्ट्रीय ओझोन आयोगाचे सदस्य बनवण्यात आले. 1976 मध्ये त्या भारतीय हवामान खात्याच्या उपमहासंचालक म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी 'द हँडबुक फॉर सोलर रेडिएशन डेटा फॉर इंडिया'  आणि 'सोलर रेडिएशन ओव्हर इंडिया' ही दोन पुस्तके देखील लिहिली. 1994 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्या सतत आजारी होत्या. 16 ऑगस्ट 2001 रोजी तिरुवनंतपुरम येथे त्यांचे निधन झाले.

हेही वाचा :

Google कडून भारताचा स्वातंत्रोत्सव साजरा, भारताची संस्कृती दाखवत बनवले खास Doodle!

Balamani Amma : बालमणी अम्मा यांची 113वी जयंती; गुगलकडून खास डूडल

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget