Balamani Amma : बालमणी अम्मा यांची 113वी जयंती; गुगलकडून खास डूडल
गुगलनं आज बालमणी अम्मा यांच्या जयंतीनिमित्त खास डुडल (Google Doodle) तयार केलं आहे.
![Balamani Amma : बालमणी अम्मा यांची 113वी जयंती; गुगलकडून खास डूडल google doodle balamani amma grandmother of malayalam literature Balamani Amma : बालमणी अम्मा यांची 113वी जयंती; गुगलकडून खास डूडल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/19/cf73840157e1a88f4093283694a28adc1658206453_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Balamani Amma : मल्याळम साहित्यिक आणि प्रसिद्ध कवियित्री बालमणी अम्मा (Balamani Amma) यांची आज 113 वी जयंती आहे. बालमणी अम्मा यांच्या कविता प्रेरणादायी आहेत. गुगल या सर्च इंजिननं आज बालमणी अम्मा यांच्या जयंती निमित्त खास डुडल (Google Doodle) तयार केलं आहे. आर्टिस्ट देविका रामचंद्रन यांनी हे गुगल डुडल तयार केलेलं आहे. Grandmother of Litreature अशी बालमणी अम्मा यांची ओळख आहे. जाणून घेऊयात बालमणी अम्मा यांच्याबद्दल...
कोण आहेत बालमणी अम्मा?
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात 1909 मध्ये बालमणी अम्मा यांचा जन्म झाला. बालमणी अम्मा यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही. बालमणी अम्मा यांचे मामा नलप्पट नारायण मेनन हे कवी होते. 19 व्या वर्षी बालमणी अम्मा यांनी व्ही.एम. नायर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. 1930 मध्ये बालमणी अम्मा यांनी कोप्पुकाई नावाची पहिली कविता प्रकाशित केली. तेव्हा त्या 21 वर्षाच्या होत्या. सुलोचना, श्याम सुंदर, मोहनदास आणि प्रसिद्ध लेखिका कमला दास ही बालमणी अम्मा यांची मुलं आहेत. कमल दास यांनी बालमणी अम्मा यांच्या कमला या कवितेचा अनुवाद देखील केला होता.
Poetess of motherhood असंही बालमणी अम्मा यांना संबोधलं जातं. बालमणी अम्मा यांनी कुदुम्बिनी, धर्ममार्गथिल, श्रीहृदयम्, प्रभांकुरम, भवनायिल, ओंजालिनमेल, कलिककोट्टा, वेलिचथिल यांसारख्या कवितांचे लेखन केलं. सरस्वती सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार आणि एझुथाचन पुरस्कार या पुरस्कारांनी बालमणी अम्मा यांना गौरवण्यात आलं. याच बरोबर त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं.
2004 मध्ये बालमणी अम्मा यांचे निधन झाले
बालमणी अम्मा यांचे 20 हून अधिक गद्य, अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांनी 2004 मध्ये अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)