Google Hangouts सर्व्हिस बंद, असा डाऊनलोड करा तुमचा डेटा
Google Hangouts : गूगलने ( Google ) Google Hangouts सेवा कायमस्वरूपी बंद केली असून यूजर्सला हँगआउट डेटा डाउनलोड करण्यासाठी 1 जानेवरी 2023 पर्यंतचा वेळ दिला आहे.
Google Hangouts is Closed : गूगलने ( Google ) हँगआउट ( Google Hangouts ) सेवा कायमस्वरूपी बंद केली आहे. गुगल हँगआऊट हे गुगलचं इंस्टंट मेसेंजिंग ॲप आहे. आजपासून ही सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. 2013 साली गुगलने गुगल हँगआऊटला स्वतंत्र अप म्हणून लाँच केलं होतं. पण आता गुगल हँगआऊट सेवा अँड्रॉइड ( Android ), आयओएस ( iOS ) किंवा कोणत्याही वेब ब्राऊजरवर वापरता येणार नाही. Google Hangouts आधी Google Stadia, YouTube Originals, Google+, Google Allo और Google Play Music या सेवाही गुगलने बंद केल्या आहेत.
Google Hangouts सेवा कायमस्वरूपी बंद
गुगलने 2020 साली गुगल चॅट ( Google Chat ) लाँच केलं होतं. हा तेव्हाच गुगल चॅट हा हँगआऊटसाठी पर्याय असल्याचं समोर आलं होतं. यासोबतच गुगल कंपनीने युजर्सला जी-मेल ( G-Mail ) मध्ये चॅटचा पर्याय उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतरही गुगल हँगआऊट्स ॲपची सेवा सुरु होती. पण आता गुगलने Google Hangouts सेवा पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे गुगल हँगआऊट ऐवजी आता युजर्सना गुगल चॅटमध्ये अपग्रेड व्हावं लागणार आहे.
Android आणि iOS साठी जुलैपासूनच सेवा बंद
या वर्षाच्या सुरुवातीला, गुगनने अँड्रॉइड ( Android ) आणि आयओएस ( iOS ) वर Hangouts सेवा बंद करण्यास सुरुवात केली होती. 2022 च्या जुलै महिन्यामध्ये अँड्रॉइड ( Android ) आणि आयओएस ( iOS ) वर Google Hangouts सेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी, गुगल कंपनीने युजर्सना Hangouts पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं.
गुगल हँगआऊट पूर्णपणे बंद करण्यात आलं असून युजर्सला हँगआऊटमधील डेटा डाऊनलोड करण्यासाठी 01 जानेवारी 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
गुगल हँगआऊटमधील डेटा कसा डाऊनलोड कराल? ( How to Download Google Hangouts Data )
- Google Takeout मध्ये जाऊन तुमच्या गुगल हँगआऊटच्या अकाऊंटचं साइन इन करा.
- त्यानंतर आलेल्या पर्यायांमधील फक्त Hangouts पर्याय निवडा. Next Step वर क्लिक करा.
- तुम्हाला किती वेळा बॅकअप डाउनलोड करायचा आहे ते निवडा. Hangouts लवकरच Google Chat वर अपग्रेड करण्यात येत असल्याने, एक वेळा डेटा डाउनलोड करण्याचा पर्याय निवडा.
- फाइल प्रकार निवडा आणि एक्सपोर्ट पर्यायावर क्लिक करा.
एकदा तुम्ही एक्सपोर्ट पर्याय निवडल्यावर, तुम्हाला एक पॉप अप दिसेल ज्यामध्ये Google Hangouts तुमच्या फाइल्सची एकत्रित करत असल्याचं सांगण्यात येईल. टेकआउट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक ईमेल येईल. एकदा तुम्हाला ईमेल आल्यानंतर, तुमचा Hangouts डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त फाइल डाउनलोड करावी लागेल.