Google Year in Search: वर्षभरात गुगलवर सर्वाधिक काय सर्च केलं गेलं? जाणून घ्या 2022 मधील टॉप सर्च
Google Year in Search: गुगलने आपला 'इयर इन सर्च 2022' अहवाल (google year in search 2022) प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये या वर्षी चर्चेत आलेल्या आणि प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींबद्दल सांगितले आहे.
Google Year in Search: गुगलने आपला 'इयर इन सर्च 2022' अहवाल (google year in search 2022) प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये या वर्षी चर्चेत आलेल्या आणि प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींबद्दल सांगितले आहे. ही यादी दरवर्षी वेगवेगळ्या देशांसाठी प्रसिद्ध केली जाते. यावर्षी नेटकाऱ्यानी गुगलवर अग्निपथ योजना काय आहे, नाटो काय आहे, एनएफटी म्हणजे नेमकं काय आहे? अशा बऱ्याच गोष्टी सर्च केल्या आहेत. यामध्येच वर्षात सर्वाधिक टॉप सर्च (google top searches india) कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
अग्निपथ योजना काय आहे? (What is Agneepath Scheme)
अग्निपथ योजना ही एक नवीन योजना आहे जी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कर (Army), हवाई दल (Indian Air Force) आणि नौदलाच्या (Indian Navy) तिन्ही शाखांमध्ये आणली आहे. निवड झाल्यानंतर हे नवीन जवान अग्निवीर म्हणून ओळखले जातील आणि त्यांचा कार्यकाळ 4 वर्षांचा असेल.
नाटो काय आहे? (What is NATO)
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ही 1949 मध्ये 28 युरोपियन देश आणि 2 उत्तर अमेरिकन देशांदरम्यान तयार केलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. राजकीय आणि लष्करी माध्यमांद्वारे त्याच्या सदस्य राष्ट्रांना स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची हमी देणे आणि सुरक्षा संबंधित मुद्द्यांवर सहकार्याद्वारे देशांमधील संघर्ष रोखणे हे नाटोचे उद्दिष्ट आहे.
एनएफटी काय आहे? (What is NFT)
नॉन-फंजिबल टोकन (NFT) हे एक नॉन-फंजिबल टोकन आहे. तुम्ही याला डिजिटल अॅसेट असेही म्हणू शकता. जी कला, संगीत आणि गेम यांसारख्या इंटरनेट संग्रहित वस्तूंचे प्रतिनिधित्व करते. जी कला, संगीत आणि गेम यांसारख्या इंटरनेट संग्रहित वस्तूंचे प्रतिनिधित्व करते. विविध उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक विद्यमान टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर NFT आधारित उत्पादने जोडल्यामुळे आर्थिक भरभराटीची मोठी शक्यता आहे. सध्या भारत हा NFTs आणि गेमिंग, आर्थिकीकरण आणि सोशल नेटवर्किंग यासाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे.
पीएफआय काय आहे? (What is PFI)
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही भारतातील कट्टर इस्लामिक संघटना होती. 17 फेब्रुवारी 2007 रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI ची स्थापना झाली. दक्षिण भारतातील तीन मुस्लिम संघटना एकत्र करून ही संघटना स्थापन करण्यात आली. यामध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ केरळ, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि तामिळनाडूच्या मनिथा नीती पसराई यांचा समावेश होता. पीएफआयचा दावा आहे की, सध्या ही संघटना देशातील 23 राज्यांमध्ये सक्रिय आहे.
सरोगसी म्हणजे काय? (What is surrogacy)
सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेचं गर्भाशय भाड्यानं घेऊन तिच्या मदतीनं अपत्य जन्माला घालणे. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मूळ प्राप्त होऊ शकतं. काही महिला किंवा पुरुष सक्षम नसल्यामुळे किंवा याआधी अबॉर्शन झाल्यामुळे काही कपल्स मूल जन्माला घालू शकत नाही. मात्र त्यांच्यासमोर सरोगसीचा पर्याय असतो.
सूर्यग्रहण काय म्हणजे नेमकं काय? (what is solar eclipse )
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे असलेली सूर्याची प्रतिमा काही काळासाठी पूर्णपणे झाकलेली असते. या प्रक्रियेलाच सूर्यग्रहण म्हणतात.
कलम 370 काय आहे? (What is Article 370 )
भारतीय राज्यघटनेचा कलम 370 हा जम्मू आणि काश्मीरला स्वायत्तता प्रदान करणारा एक कायदा होता. कलम 370 अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या संविधान सभेला भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांची राज्यात अंमलबजावणी करावी याची शिफारस करण्याचा अधिकार देण्यात आला होता. कलम 35A अंतर्गत जम्मू आणि काश्मीर विधानसभेला राज्यातील कायमचे रहिवासी आणि त्यांचे विशेषाधिकार परिभाषित करण्याचा अधिकार देत होते.
मेटाव्हर्स काय आहे? (What is metaverse)
वास्तविक जगात तुम्ही प्रत्येक गोष्टीला स्पर्श करू शकता, अनुभवू घेऊ शकता. पण मेटाव्हर्स (आभासी जग) अगदी उलट आहे. मेटाव्हर्स हे एक आभासी जग आहे. जे पूर्णपणे हाय-स्पीड इंटरनेटवर अवलंबून आहे. हायस्पीड इंटरनेट आणि गॅझेट्सशिवाय या जगात जाणे शक्य नाही. वास्तविक जगात, एखाद्या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष जावे लागते, परंतु मेटाव्हर्समध्ये, तुम्ही घरी बसून अमेरिकेला किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्याला भेट देऊ शकता.
मायोसिटिस काय आहे? (what is myositis )
मायोसिटिस हा आजार आहे. आपल्या शरीरातील मांस पेशींना आलेल्या सूजेमुळे मायोसिटिस हा आजार जडत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. हा आजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना होण्याची शक्यता अधिक असते, असंही म्हटलं जातं. मायोसिटिस ही एक अशी ऑटोइम्युन कंडिशन असते ज्याचा परिणाम शरीरातील मांस पेशींवर होतो.