एक्स्प्लोर
हॅप्पी बर्थडे गुगल... 19व्या वाढदिवसानिमित्त गुगलचं खास डुडल
कायम नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून यूजर्सला नवनव्या गोष्टींची ओळख करुन देणाऱ्या गुगलला आज तब्बल 19 वर्ष पूर्ण झाली आहेत.
मुंबई : आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्याच्या पोटात दडलेलंय त्या 'गुगल'चा आज १९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं गुगलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या डुडलमध्ये १९ सरप्राईज दडले आहेत.
कायम नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून यूजर्सला नवनव्या गोष्टींची ओळख करुन देणाऱ्या गुगलला आज तब्बल 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. याचवेळी स्वत:च्या बर्थडेनिमित्त देखील गुगलनं यूजर्सला खास भेट दिली आहे.
आजच्या गुगल डुडलवर क्लिक केल्यावर आपण येतो एका स्पिन व्हिलवर. हे स्पिन व्हिल फिरवताच प्रत्येक टप्प्यावर छान-छान सरप्राईज आणि मोहात पाडणारे गेम्स आहेत.
हे सरप्राईज म्हणजे गुगलने गेल्या १९ वर्षांत लाँच केलेले १९ सरप्राइज आहेत. यात गुगलच्या प्रसिद्ध झालेल्या 'स्नेक' गेमचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement