एक्स्प्लोर
सनीसोबत सेल्फी घेण्याची संधी, रिंगिंग बेल कंपनीचा खास कार्यक्रम
नवी दिल्लीः जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'फ्रिडम 251' बनवणारी कंपनी रिंगिंग बेलने त्यांच्या लॉयल्टी कार्ड या कार्यक्रमाला प्रमोट करण्यासाठी अभिनेत्री सनी लिओनीची निवड केली आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्राहकांना सनीला भेटण्याची संधी मिळणार आहे.
कंपनीने हा कार्यक्रम खास ग्राहकांसाठी सुरु केला आहे. गेल्या महिन्यात सुरु केलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक शहरातील 10 लकी लॉयल्टी कार्ड सदस्यांना सनीला भेटण्याची संधी मिळणार आहे. तसंच तिच्यासोबत सेल्फीही काढता येणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली.
हा कार्यक्रम 8 नोव्हेंबर रोजी देहरादून आणि मेरठमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर 9 नोव्हेंबर रोजी कानपूर आणि आग्रा येथे कार्यक्रम होणार आहे. रिंगिंग बेल कंपनीच्या वेबसाईटवर 500, 1000 आणि 2000 रुपयांच्या लॉयल्टी कार्डची विक्री सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement