(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Valorant Game : प्रसिद्ध व्हिडीओ गेम वॅलोरण्टमध्ये पहिल्यांदाच इंडियन कॅरेक्टर, एजंट हार्बर ऊर्फ वरूण बत्रा असणार नाव
Valorants first Indian agent : रिओट गेम्स या प्रसिद्ध गेमिंग कंपनीने त्यांचा लोकप्रिय गेम वॅलोरण्टमध्ये आता एका भारतीय कॅरेक्टरचा समावेश होणार आहे.
Valorants first Indian agent Harbor : भारतात ऑनलाईन गेम्स (Online Games) खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मागील काही वर्षात आलेल्या पब्जीसारख्या (Battle Royale Games) मोबाईल गेम्सनी हे गेम खेळणाऱ्यांची संख्या आणि गेम खेळण्याचा वेळ कमालीचा वाढला आहे. मोबाईलसह कॉम्प्युटरमध्ये गेम खेळणाऱ्यांची संख्याही अधिक असून एक प्रसिद्ध गेम वॅलोरण्टने भारतातील गेमची वाढती लोकप्रियता पाहता एका भारतीय नवीन एजेंटचा समावेश केला आहे.
वॅलोरण्ट हा रिओट गेम्सने विकसित आणि प्रकाशित केलेला सर्वात लोकप्रिय फ्री-टू-प्ले फर्स्ट-पर्सन शूटर गेम आहे. हा गेम खेळणाऱ्यांची संख्या जगभरात कोट्यवधी आहे. दरम्यान रिओट गेम्स कंपनीने मुंबईतील महालक्ष्मी येथील फेमस सिने बिल्डिंगमध्ये वॅलोरण्टचा पहिला भारतीय एजंट हार्बर ऊर्फ वरूण बत्राच्या पदार्पणानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता हार्बर हा एजंट 19 ऑक्टोबरपासून गेममध्ये उपलब्ध होणार आहे. हार्बरचा हा लॉन्च कार्यक्रम अगदी रंगतदार होता. यावेळी हार्बर गेममध्ये येणार असल्याच खास ट्रेलर (trailer) यावेळी दाखवण्यात आला. यामध्ये हार्बर त्याच्या धांसू मोटरबाईकवरुन दमदार एन्ट्री घेत असून त्याची स्टोरीही शॉर्टमध्ये ट्रेलमध्ये दिसून आली, हा ट्रेलर सोशल मीडियावरही वॅलोरण्टने ट्वीटरवर पोस्ट केला आहे.
Wanna know what happens next? ▶️ https://t.co/VGCZa4ZsQc pic.twitter.com/v0dRCs7eL7
— VALORANT (@PlayVALORANT) October 12, 2022
कसा आहे वॅलोरण्ट गेम?
रिओट गेम्स (Riot Games) ची स्थापना 2002 मध्ये झाली असून त्यांनी आजवर अनेक दमदार गेम समोर आणले आहेत. 2009 मध्ये, रिओटने त्याचे पहिले टायटल लीग ऑफ लीजेंड्स जगभरात प्रसिद्ध केले. ही लीग जगातील सर्वाधिक खेळली जाणारी पीसी गेम बनली ज्यानंतर त्यांनी वॅलोरण्ट गेमही समोर आणला. वॅलोरण्ट हा कम्पुटरसाठी स्पर्धात्मक 5v5 कॅरेक्टर-आधारित टॅक्टिकल शूटर गेम आहे. वॅलोरण्ट हा एक रंगतदार मल्टीप्लेअर गेम आहे, ज्यामध्ये आधुनिक गनप्ले, विविध प्रकारच्या तोफा, अद्वितीय क्षमता असलेले एजंट्स आणि हजारो तासांच्या खेळासाठी स्पर्धात्मकपणे ट्यून केलेले नकाशे आहेत. वॅलोरण्ट हा एक फ्री-टू-प्ले गेम आहे आणि विविध प्रकारच्या पीसी हार्डवेअरवर परफॉर्म करण्यासाठी तयार केलेला आहे, ज्यामुळे जगभरातील गेमर्समध्ये याची क्रेझ आहे.
हे देखील वाचा-