एक्स्प्लोर
फेसबुकचं मार्केट रिसर्चसाठी नवीन अॅप, माहिती शेअर करणाऱ्यांना पैसे मिळणार
फेसबुककडून आता 'स्टडी' नावाचे एक अॅप लाँच करण्यात आले आहे. हे अॅप सुरुवातील केवळ 'प्ले स्टोअर'वर उपलब्ध असणार आहे.
![फेसबुकचं मार्केट रिसर्चसाठी नवीन अॅप, माहिती शेअर करणाऱ्यांना पैसे मिळणार FACEBOOK launches new app that pays users for data on app usage फेसबुकचं मार्केट रिसर्चसाठी नवीन अॅप, माहिती शेअर करणाऱ्यांना पैसे मिळणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/04170955/fb-fake-account.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KRAKOW, POLAND - 2018/12/05: In this photo illustration, the Facebook logo is seen displayed on an Android mobile phone. (Photo Illustration by Omar Marques/SOPA Images/LightRocket via Getty Images)
फेसबुकने मार्केट रिसर्चसाठी एक नवीन अॅप नुकतेच लाँच केले आहे. या अॅपद्वारे फेसबुककडून एखादा युजर मोबाईलमध्ये कोणते अॅप वापरतो याची माहिती गोळा केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही माहिती शेअर करण्यासाठी फेसबुक पैसे देणार आहे.
स्पर्धेत टिकण्यासाठी सध्या ऑनलाईन विश्वातील प्रत्येक कंपनी युजर्सला नवीन नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे. फेसबुकही मार्केट रिसर्च करुन लोकांना नवीन काय देता येईल याबाबत माहिती घेत असतं. यासाठी फेसबुककडून यापूर्वी दोन अॅप लाँच करण्यात आले होते. मोबाईल युजर्स त्यांच्या फोनवर काय काय करतात याची माहिती मिळवण्याचं काम हे दोनअॅप करत होते. परंतू त्यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीला धोका असल्याची या अॅपवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर ते बंद करण्यात आले.
फेसबुककडून आता नव्याने यासाठी 'स्टडी' नावाचे एक अॅप लाँच करण्यात आले आहे. हे अॅप सुरुवातील केवळ 'प्ले स्टोअर'वर उपलब्ध असणार आहे. हे नवीन अॅप तुमच्या फोनमध्ये तुम्ही कोणकोणते अॅप्स वापरता, किती वेळेसाठी वापरता, कोणत्या फिचर्सचा वापर करता याची माहिती गोळा करेल. यामुळे फेसबुकला इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठीची माहिती मिळवता येणार आहे.
या अॅपद्वारे कोणतेही पासवर्ड किंवा अकाउंटची माहिती गोळा करण्यात येणार नाही असं फेसबुककडून सांगण्यात येत आहे. तुमच्या फोनमधील फोटोज किंवा इतर संवेदनशील माहिती देखील ते अॅप जमा करणार नाही.
या अॅप बाबतही काही तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या अॅपमुळे प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. हे अॅप नेमकी काय माहिती पाठवणार आहे याची युजर्सला कल्पना नसणार, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
'या अॅपद्वारे लोकांना जाहीराती दाखवण्यात येणार नाहीत. तसेच अॅपद्वारे जमा केली जाणारी माहिती इतर कंपन्यांना देण्यात येणार नाही', असंही फेसबुककडून सांगण्यात येत आहे. सुरुवातीला हे अॅप भारतात आणि अमेरिकेत लाँच करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे लोकांना नेमके किती पैसे देण्यात येतील त्याबद्दल कोणतीही माहिती आणखी देण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)