Elon Musk : एलॉन मस्क यांचं सौरऊजेबाबत मोठं वक्तव्य, काय म्हणाले तुम्हीच वाचा
Elon Musk on Solar Energy : टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी आता सौरऊजेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचं नवं ट्विट सध्या चर्चेत आहे.
Elon Musk on Solar Energy : टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. एलॉन मस्क नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता मस्क यांनी सौरऊर्जेबाबत (Solar Energy) मोठं वक्तव्य केलं आहे. मस्क यांनी म्हटलं आहे की, भविष्यातील जीवन हे मुख्यत: सौरऊजेवर अवलंबून असणार आहे. त्यांनी ट्विटरवरूल एका पोस्टला प्रतिक्रिया देत हे वक्तव्य केलं आहे. अलिकडेच मस्क त्यांच्या यूट्युबवरील वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. मस्क यांनी यूट्यूब ही एक नॉन स्टॉप स्कॅम जाहिरात असल्याचं म्हटलं होतं. ट्विटरची खरेदी केल्यापासून मस्क सतत चर्चेत आहेत. सध्या त्यांची ट्विटरसोबतची डील अडकली आहे.
वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग या ट्विटर अकाऊंटने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये असं लिहिलं होतं की, जगाला सौरऊजा पुरवण्यासाठी सहारा वाळवंटाएवढं पृष्ठभागाचं क्षेत्र आवश्यक आहे. एवढ्या पृष्ठभाातून 2,500 kWh/m² प्रति वर्ष सह केंद्रित सौर ऊर्जा तयार होऊ शकते. या अकाऊंटने जगात फक्त सौरऊजेचा वापर केला तर कोणत्या खंडात किती ऊर्जा आवश्यक असेल, याबाबत एका अभ्यासाची माहिती दिली. या अभ्यासानुसार, संपूर्ण जगाला ऊर्जा पुरवण्यासाठी सहारा वाळवंटाच्या पृष्ठभागाएवढं क्षेत्र आवश्यक असेल, असं म्हटलं आहे. याला उत्तर देताना मस्क यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'भविष्यात जीवन सौरऊर्जेवर जास्त अवलंबून असेल.'
Civilization will be mostly solar-powered in the future
— Elon Musk (@elonmusk) June 10, 2022
या अभ्यासानुसार, जगाला एक तास सौरऊर्जा पुरवण्यासाठी 23,398 टेरावॅट/तास एवढी ऊर्जा लागेल. तर केवळ आशिया खंडाला एक तास सौरऊर्जा पुरवण्यासाठी 11,614 टेरावॅट/तास एवढी ऊर्जा लागेल. तर सर्वात कमी सैरऊर्जा आफ्रिका खंडाला लागणार आहे. आफ्रिका खंडाला 722 टेरावॅट प्रतितास सौरऊर्जा लागेल. सर्वाधिक सौरऊर्जा आशिया खंडाला लागणार आहे.
Surface area in the Sahara desert 🏜 required to power the world with solar energy (Concentrated solar power plant with 2,500 kWh/m² a year). pic.twitter.com/DbIAc5jGnK
— World of Engineering (@engineers_feed) June 10, 2022
महत्वाच्या बातम्या