एक्स्प्लोर
Advertisement
या मेसेजवर क्लिक करु नका, अन्यथा व्हॉट्सअॅप क्रॅश होणार!
तुम्ही कधी कल्पना केली आहे का, की एखादा मेसेज ओपन करताच तुमचं मेसेंजर क्रॅश किंवा हँग होईल? ही बातमी खरी आहे. अशा प्रकारचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे
मुंबई : व्हॉट्सअॅपवर अनेक मेसेज व्हायरल होत असतात. मात्र तुम्ही कधी कल्पना केली आहे का, की एखादा मेसेज ओपन करताच तुमचं मेसेंजर क्रॅश किंवा हँग होईल? ही बातमी खरी आहे. अशा प्रकारचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे, ज्यामुळे अनेक युझर्स अक्षरशः वैतागले आहेत.
नेमका मेसेज काय आहे?
हा फॉरवर्डेड मेसेज व्हॉट्सअॅपवर येताच अॅपसोबतच अकाऊंटही फ्रीज होत आहे. ‘जर तुम्ही ब्लॅक आयकॉनवर क्लिक केलं तर तुमचं व्हॉट्सअॅप हँग होईल,’ अशा पद्धतीचा हा मेसेज आहे. मेसेजमध्ये एक ब्लॅक आयकॉन दिसत आहे, ज्यावर क्लिक करताच व्हॉट्सअॅप हँग किंवा क्रॅश होईल. हा मेसेज खरा असून अनेक युझर्सने याची तक्रारही केली आहे.
व्हॉट्सअॅप हँग होण्यासाठी ब्लॅक डॉट हे एकमेव कारण नाही. टेक्स्ट आणि ब्लॅक डॉट यांच्यात एक स्पेस आहे. जेव्हा हा मेसेज HTML मध्ये बदलण्यात आला तेव्हा दिसून आलं, की टेक्स्टमध्ये राईट टू लेफ्ट मार्क आहे. हा एक अदृश्य पद्धतीचा फॉरमॅट आहे, ज्याला लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट या अंतराने वापरलं जाऊ शकतं.
युझर्स जेव्हा इंग्रजी टेक्स्टचा वापर करतात, तेव्हा LRM म्हणजे लेफ्ट टू राईट दिशेने फॉरमॅटिंग कॅरेक्टरचा वापर होतो. मात्र, व्हॉट्सअॅपमध्ये याचा वापर RLM म्हणजेच राईट टू लेफ्ट पद्धतीने केला जातो. याचमुळे व्हॉट्सअॅप हँग किंवा क्रॅश होत आहे.
अँड्रॉईड युझर्ससाठी चिंतेची बाब
तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल, तर तुम्ही या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, आयफोन युझर्सना या मेसेजचा कोणताही धोका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement