एक्स्प्लोर
जिओला टक्कर, डेटाविंडची अवघ्या 17 रुपयात महिनाभर इंटरनेट सेवा!
![जिओला टक्कर, डेटाविंडची अवघ्या 17 रुपयात महिनाभर इंटरनेट सेवा! Datawind Will Offer Data At Rs 200 For One Year जिओला टक्कर, डेटाविंडची अवघ्या 17 रुपयात महिनाभर इंटरनेट सेवा!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/31091223/JIO-and-datawind.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: रिलायन्सनं जिओनं आपल्या मोफत ऑफरनं अनेक बड्या दूरसंचार कंपन्यांना मोठा धक्का दिला आहे. पण आता 1 एप्रिलपासून जिओच्या सेवेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. पण आता यादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच एक नवी कंपनी आपल्या यूजर्सना जवळजवळ 17 रुपयात महिनाभर इंटरनेट डेटा देणार आहे.
कॅनडाची मोबाईल कंपनी डेटाविंड 200 रुपयात वर्षभरासाठी इंटरनेट डेटा प्लान देण्याची योजना तयार करत आहे. यासाठी कंपनी जवळजवळ 100 कोटींची गुंतवणूक करणार आहे. भारतात परवाना मिळाल्यानंतर कंपनी पहिल्या सहा महिन्यात ही गुंतवणूक करणार आहे.
स्वस्त स्मार्टफोन आणि टॅब तयार करणारी कंपनी डेटाविंडनं भारतात नेटवर्क सर्विस प्रोव्हाईडरसाठी परवाना मिळावा यासाठी अर्ज केला आहे. हा परवाना मिळाल्यानंतर कंपनी डेटा सर्विस आणि टेलीनेटवर्क सर्विस सुरु करणार आहे.
दरम्यान, ही या कंपनीला भारतातील इतर दूरसंचार कंपनीसोबत भागीदारी करावी लागणार आहे. त्यानंतरच डेटाविंड आपल्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतं.
कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तुली यांनी सांगितलं की, 'एका महिन्याच्या आत आम्हाला परवाना मिळण्याची आशा आहे. डेटाविंड व्यवसाय सुरु करण्यासाठी पहिल्या सहा महिन्यात 100 कोटींची गुंतवणूक करेल. कंपनीचं जास्तीत जास्त लक्ष हे डेटा सर्विसवर असणार आहे.'
'आम्ही 20 रुपये महिना किंवा त्यापेक्षा कमी किंमतीवर सेवा देऊ.' असं म्हणत तुली यांनी जिओचाही उल्लेख केला.
'जिओचा 300 रुपयांचा प्लान केवळ त्यांच्यासाठी चांगला आहे जे दर महिन्याला 1000 ते 1500 रुपये खर्च करु शकतात. अशा लोकांची संख्या केवळ 30 कोटी आहे. बाकीची जनता दर महिन्याला केवळ 90 रुपये खर्च करते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही ऑफर स्वस्त नाही. पण वर्षाभरासाठी 200 रुपये हे फार महाग नाही. ' असं तुली म्हणाले.
संबंधित बातम्या:
'जिओ'च्या मोफत ऑफरचा आज शेवटचा दिवस!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)