Singapore : सिंगापूरचे 'ड्रायव्हरलेस' सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे पाऊल, विना चालक बसची सुरुवात
Singapore : या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अॅपच्या माध्यमातून बुकिंग करावं लागणार आहे. या पद्धतीच्या वाहनांमुळे परदेशी कर्मचाऱ्यावंरचं अवलंबन कमी होणार असल्याचं सिंगापूरच्या प्रशासनाचं मत आहे.
सिंगापूर : नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या सिंगापूर आता 'ड्रायव्हरलेस' सार्वजनिक वाहतुकीकडे पाऊल टाकलं आहे. सिंगापूरमध्ये पहिली सार्वजनिक ड्रायव्हरलेस बस सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीचे तीन महिने ही बस ट्रायल बेसवर चालणार आहे. सिंगापूरच्या या ड्रायव्हरलेस बसबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. (Singapore moving towards a driverless public transport network).
सिंगापूरमध्ये या आधीही ड्रायव्हरलेस वाहनांची सुरुवात करण्यात आली आहे. पण आता सुरु करण्यात आलेल्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना शुल्क द्यावं लागणार आहे. या बसमधून प्रवास करताना कोणतीही भीती किंवा धोका वाटत नसल्याचं मत प्रवाशांनी व्यक्त केलंय. ही बस धावताना वेग नियंत्रित असतो. बसचा कमाल वेग हा ताशी 25 किमी इतका आहे. त्यामुळे वळण घेतानाही एकदम आरामशीर पद्धतीने वळण घेतलं जातं.
अॅपच्या माध्यमातून प्रवासाचं बुकिंग
या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अॅपच्या माध्यमातून बुकिंग करावं लागणार आहे. त्यानंतरच ते हवं त्या ठिकाणी प्रवास करु शकतात. सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये ट्रायल बेसवर या बसचं परिक्षण करण्यात येत असल्याने यामध्ये ड्रायव्हर असणार आहे. आवश्यक असेल तिथे हा ड्रायव्हर हस्तक्षेप करेल.
सिंगापूरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नाविण्यपूर्ण प्रयोग केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ही ड्रायव्हरलेस बस सुरु करण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये या आधी अनेक विना ड्रायव्हर बस आणि वाहनं सुरु झाली आहेत. या पद्धतीच्या वाहनांमुळे परदेशी कर्मचाऱ्यावंरचं अवलंबन कमी होणार असल्याचं सिंगापूरच्या प्रशासनाचं मत आहे.
संबंधित बातम्या :