Royal enfield लॉन्च करणार 250cc इंजिनची नवी बाईक
Royal Enfield आता स्वस्त बाईक तयार करण्यासाठी काम करत असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच कंपनीच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, कंपनी 14 नव्या बाईक्स मार्केटमध्ये दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
नवी दिल्ली : आपल्या दमदार बाईक्ससाठी ओळखली जाणारी Royal Enfield आता स्वस्त बाईक तयार करण्यासाठी काम करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी एक 250cc इंजिन असणारी बाईक तयार करत आहे. तसेच काही मीडिया रिपोर्ट्समध्येही या बाईकबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप कंपनीने या बाईकबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. परंतु, कंपनीच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, कंपनी 14 नव्या बाईक्स मार्केटमध्ये दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
Royal Enfield च्या 250cc बाईकचा थेट सामना Bajaj Dominar 250, BS6 Yamaha FZ25 आणि Husqvarna Svartpilen 250 यांसारख्या बाईक्सशी होणार असल्याचं बोललं जात आहे. एवढचं नाहीतर सुत्रांच्या माहितीनुसार, Royal Enfield ची 250cc इंजिन असणाऱ्या बाईकची किंमत एक लाख रूपये असू शकते. या बाईक व्यतिरिक्त कंपनी हिमालयनचं नवं व्हेरियंट आणि एक रोडस्टर बाईकही घेऊन येण्याच्या तयारीत आहे.
Royal Enfield Classic 350 चा नवा अवतार
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Royal Enfield आपल्या classic 350 चा नवा अवतारही लॉन्च करणार आहे. दरम्यान, Classic 350 बऱ्याच वर्षांपासून भारतात लोकप्रिय आहे. या बाईकचं डिझाइन, फिचर्स आणि याचा दमदार परफॉर्मन्समुळे ही बाईक लोकप्रिय आहे. असं सांगण्यात येत आहे की, नवीन मॉडल जास्त प्रीमियम आणि जास्त फिचर्स कमी असेल. याव्यतिरिक्त मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नव्या मॉडेलमध्ये नवीन अलॉय व्हिल्स, विंड डिफ्लेक्टर आणि नवीन डिझाइनचे टेललॅम्प, ग्रॅब रेल, फ्लूल टँक आणि एग्जॉस्ट देण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ज्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांच्या गाड्यांचे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. असं मानलं जातं आहे की, लॉकडाऊननंतर नवीन मॉडेलचं लॉन्चिंग केलं जाऊ शकतं. परंतु, कोणत्या तारखेला हे लॉन्च करणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
मंदीतून बाहेर पडण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून बंपर ऑफर, 'या' गाड्यांवर खास ऑफर्स
Whatsapp Dark mode : व्हॉट्सअॅपचं नवं डार्क मोड फिचर लॉन्च; असं करा अपडेट