एक्स्प्लोर
राज्यातील सर्व चेकपोस्ट आता हायटेक होणार
मुंबई : राज्यातील सर्व चेकपोस्ट लवकरच हायटेक केले जाणार आहेत. राज्यातील सर्व चेकपोस्टवर वाहनांच्या तपासणीसाठी संगणकीकृत पद्धत अवलंबली जाणार आहे. विशेष म्हणजे वाहनांचे वजनही संगणकीकृत पद्धतीनेच होणार आहे. राज्याचे परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी याबाबत माहिती दिली.
चेकपोस्टवर संगणकीकृत पद्धत अवलंबल्यानंतर कोणतीही गाडी सरसकट निवडून तपासण्याची गरज भासणार नाही. संगणक सांगेल, ती गाडी थांबवून तपासली जाईल.
विशेष म्हणजे ओव्हरवेट गाडी असो किंवा दंड आकारण्यात आलेल्या गाड्यांची कागदपत्रे असो, सर्व ऑनलाईन पद्धतीने पुढे पाठवली जातील. यामुळे वेळ तर वाचेलच, पण त्याचबरोबर प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल.
चेकपोस्ट संगणीकृत केल्याने ओव्हरवेट वाहतुकीला आळा बसणार आहे. येत्या काही आठवड्यातच या हायटेक प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहितीही प्रवीण गेडाम यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement