BSNL 5G Services In India : 15 ऑगस्टपासून 5G सेवा स्वस्तात पुरवणार : अश्विनी वैष्णव
BSNL 5G Services In India : केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट 2023 रोजी भारतात BSNL 5G सेवा सुरु करण्यात येईल
BSNL 5G Services In India : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतात 1 ऑक्टोबर 2022 पासून 5G इंटरनेट (5G Internet Service) सेवा सुरु केली. या खास प्रसंगी Airtel ने निवडक शहरांमध्ये 5G सुरू केले आहे. तर रिलायन्स जिओने देखील या महिन्यासाठी 5G लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. Vodafone-idea ने सध्या 5G लॉन्चिंगची तारीख निश्चित केलेली नाही. या सगळ्यात आता BSNL ने देखील 5G लॉन्चिंग सेवेची तारीख जाहीर केली आहे. या संदर्भात, केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Telecom Min Ashwini Vaishnaw) यांनी माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट 2023 रोजी BSNL 5G सेवा सुरु करण्यात येईल असे दूरसंचार मंत्र्यांनी सांगितले.
In coming 6 months, 5G services to be available in over 200 cities, attempts being made to make 5G services available in 80-90% of country in next 2 years. BSNL to provide 5G services next year August 15 onwards. 5G too, to be affordable: Telecom Min Ashwini Vaishnaw, in Delhi pic.twitter.com/orj3o3elTZ
— ANI (@ANI) October 1, 2022
इंडिया मोबाईल काँग्रेस 2022 च्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हटले आहे की, "सरकारी मालकीची दूरसंचार सेवा प्रदाता BSNL 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 5G सेवा सुरू करू शकते." तसेच, या संदर्भात फारशी माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, आगामी येणाऱ्या 5G सेवेची किंमत 4G सेवेप्रमाणे परवडणारी किंमत असेल.
रिलायन्स जिओने (Reliance Jio) दिवाळीमध्ये 5 जी सेवा लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये रिलायन्स दिवाळीमध्ये 5 जी सेवा सुरु करणार आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत देशभरातील प्रत्येक शहरात आणि गाव-खेड्यात 5 जी सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, वाराणसी, चंदीगड, दिल्ली, जामनगर, गांधीनगर, मुंबई, पुणे, लखनौ, कोलकाता, सिलीगुडी, गुरुग्राम आणि हैदराबाद या शहरांचा समावेश असेल.
महत्वाच्या बातम्या :